उदगीर प्रतिनिधी:-गणेश मुंडे
उदगीर तालुक्यातील डोंगर शेळकी येथे गुरूवारी एक रुग्ण कोरोना बाधित आढळल्याने डोंगरशेळकी येथील नागरीकामध्ये खळबळ उडाली खबरदारी म्हणून आरोग्य विभाग,महसुल प्रशासन,व पोलीस प्रशासनाच्या मदतीने सदरील भाग हा पुढील चौदा दिवसा पर्यन्त 10 घरे आणि 60 नागरीकांना कन्टेनमेंन्ट झोन म्हणून जाहीर केले आहे तसेच या कालावधीत ग्रामपंचायतीच्या वतीने अत्यावश्यक सेवा पुरवल्या जाणार आहेत तसेच आरोग्य विभागाच्या वतीने सर्व नागरीकांनची काळजी घेतली जाणार आहे.कन्टेनमेंन्ट झोनमधील नागरिकांना आवश्यक उपाय योजना याची माहिती तपासणी आढावा आज शुक्रवारी प्राथमिक आरोग्य केंद्र वाढवणा चे वैद्यकीय अधिकारी डाॅ काटवटे मॅडम यांनी भेट देऊन पहाणी केले.गावातील सर्व नागरिकांनी घराबाहेर न पडता आप आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, विणाकारण घराबाहेर पडू नये,तसेच बाधित क्षेत्रातील सर्व नागरिकांना ही काळजी घ्यावी,घाबरून जाऊ नये असे आवाहन डाॅ.काटवटे मॅडम यांनी केले आहे.यावेळी वाढवणा पोलिस ठाण्याचे सपोनि बाळासाहेब नरवटे यांनी ही पहाणी करून सदरील भागात बॅरेकेट लावले आहेत व दोन कर्मचारी येथे बंदोबस्त करण्यास ठेवले आहेत तसेच प्रशासनाच्या वतीने योग्य उपाययोजना केल्या आहेत यावेळी तलाठी दत्ता मोरे,ग्रामसेवक दिपमाला आलेवार,उपसभापती बालाजी मरल्लापल्ले,सरपंच ज्ञानोबा मुंडे,पोलीस पाटील भालचंद्र शेळके,रूग्ण कल्याण समिती सदस्य गणेश मुंडे,शिवाजी शिंदे डाॅ रूबीणा पठाण,सिस्टर वाडकर,आरोग्य उपकेंद्राचे कर्मचारी आश्या कार्यक्रत्या मिरा सुवर्णकार,माधा गायकवाड,नरसा शिंदे,अंगणवाडी पवार ताई,उपस्थित होते
No comments:
Post a Comment