Sunday, 19 July 2020

लॉकडाऊनपूर्वी खरेदीसाठी लोकांची झुंबड

 कोल्हापूर - ज्ञानराज पाटील 

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढतच आहे. त्याला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सोमवारपासून पुन्हा एकदा सात दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यापूर्वीच आज रविवारी खरेदीसाठी नागरिक अक्षरश: बाजारात तुटून पडल्याचे चित्र  सकाळपासून 
 पाहायला मिळाले. किराना साहित्य व भाजीपाला आणि तत्सम जीवनावश्यक वस्तू आजच संपणार, अशा भूमिकेतून लोक खरेदी करत होते. त्यामुळे सर्वत्र सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र होते..
बाजारात  खरेदीसाठी झुंबड उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावेळी किराणा दुकानांसह इतर वस्तू विक्रीची दुकाने ग्राहकांनी फुलली होती.
कसबा बावडा परिसरातील मेन रोड हा गाड्या पार्किंग मुळे अरुंद झाला आहे. त्यातच  वाहनांची गर्दी झाल्याने सोशल डिस्टन्सिंगचा पुरता बोजवारा उडाला होता. प्रत्येकाला कमी वेळात खरेदी करून घरी परतण्याची घाई झाली होती. यामुळे अरुंद रस्त्यांवर खरेदी करताना एकमेकांच्या जवळच उभे राहावे लागले.

No comments:

Post a Comment