सैनिक टाकळी (प्रतिनिधी )
जगभरात वेगाने पसरणाऱ्या विषाणूमुळे बरेच उद्योग अडचणीत आले आहेत .कोरोनाचा वाढत चाललेला संसर्ग रोखण्यासाठी शासकीय पातळीवर ती कठोर पावले उचलली जात आहेत .प्रशासकीय पातळीवर कोरोना ची साखळी रोखण्यासाठी नियमावली केली गेली आहे. अनेकांकडून या नियमांचे उल्लंघन केले जात असले तरी येथील दूध व्यवसायिक महेश पाटील व अमर पाटील यांनी दूध वाटप करताना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. कॅन मधून दूध वाटप करत असताना पाच फुटापेक्षा अधिक अंतरावरुन प्लास्टिक पाइपद्वारे दुध ग्राहकांच्या भांड्यामध्ये सोडले जाते . यामुळे ग्राहकांचा संपर्क त्याच्याशी येत नाही . या दोन जिवलग मित्रानी केवळ नोकरी च्या पाठिमागे न लागता कोणताही व्यवसाय प्रामाणिक व निष्ठेने केल्यास यशस्वी होऊ शकतो . कष्ट करण्याची सवय व नवीन संकल्पना असली की कोणत्याही अडचणीवर ती आपण सहजपणे मात करू शकतो याचे उदाहरण या दोघांनी समाजासमोर घालून दिले आहे. गावामध्ये सुमारे नव्वद लिटर दूध स्वतः मोटर सायकलीवरुन घरपोच विक्री करतात .
No comments:
Post a Comment