Monday, 20 July 2020

कोल्हापूरात लॉकडाऊनला उस्फूर्त प्रतिसाद - सगळीकडे शुकशुकाट - वाहनांची कडक तपासणी


कसबा बावडा प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अगदी घरापर्यंत येऊन पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. चार दिवसांपासून तर दररोज दीडशे ते दोनशे रुग्ण वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी तसेच कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. पुढील सात दिवस जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. आज सकाळपासून कोल्हापुरात लॉकडाऊनला सुरूवात झाली असून सकाळपासून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
शहर आणि उपनगरात सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे.
नेहमीच गजबजलेल्या कसबा बावडा येथील मेन रोड संपूर्ण निर्मनुष्य दिसून येत आहे.
याबरोबरच पोलीस प्रशासनाकडून सर्व वाहनांची तपासणी केली जात असून विनाकारण फिरताना दिसला तर दंडासह कडक कारवाई करण्यात येणार आहे. 
सकाळी फक्त दूध संकलन व वितरण तसेच अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांशिवाय एकही नागरिक रस्त्यावर दिसत नाही.
याबरोबरच खाजगी दवाखान्यात येणारे रुग्ण आणि तुरळक प्रमाणात औषधांसाठी नागरिक अगदीच गरज असेल तरच बाहेर पडले असे चित्र दिसत होते.
संपूर्ण शहरात फक्त औषध दुकाने सुरु असणार आहेत. कसबा बावडा उपनगरात औषध दुकानांनीसुद्धा सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत वेळ मर्यादित ठेवली आहे. जेणेकरून सायंकाळनंतर नागरिक अनावश्यक पणे बाहेर पडणार नाहीत अशी काळजी घेण्यात आली आहे.
संपूर्ण शहर आणि उपनगरात चौकाचौकांत बॅरिकेड लावण्यात आले आहेत आणि कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रत्येक वाहनांची चौकशी करण्यात येत आहे.

कोल्हापूर जिल्हा आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या - 2274

कोरोनामुळे मृत्यू - 56

वाढत्या रुग्णांमुळे जिल्हा प्रशासनाकडून कडक लॉकडाऊन 

सात दिवसांचा लॉकडाऊन

No comments:

Post a Comment