गांधीनगर : प्रतिनिधी
गांधीनगर बाजारपेठेत झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना महामारीच्या प्रतिबंधासाठी लढणाऱ्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना व सामाजिक जनजागृती करणाऱ्या 70 वर कोरोना योद्ध्यांना विशाल पहुजा फाउंडेशनच्या वतीने रेनकोट वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी उपसरपंच सोनी सेवलानी होत्या.
फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल पहुजा यांच्या हस्ते साठवर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप करण्यात आले, तर ग्रामपंचायत सदस्य प्रताप चंदवाणी यांच्या हस्ते जनजागृती करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. विशाल पहुजा फाउंडेशन च्या वतीने प्रभागवार औषध फवारणी करण्यात येत आहे. कोरोना महामारीचा प्रतिबंध करण्यासाठी लागेल ती मदत करण्यास आपले फाउंडेशन तयार असल्याची ग्वाही संस्थापक अध्यक्ष विशाल पहुजा यांनी दिली. धीरज तेहल्यानी यांनी स्वागत केले, तर सनी चंदवाणी यांनी प्रास्ताविक केले. उपसरपंच सोनी सेवलानी यांनी पहुजा फाउंडेशनने कोरोना महामारीच्या प्रतिबंधासाठी दिलेल्या मदतीबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली. ग्रामपंचायत सदस्य गणेश देवकुळे, प्रशांत कुलकर्णी, विनोद हुजूराणी, दीपक जमनानी, पप्पू पाटील, सुनील निरंकारी यांची यावेळी उपस्थिती होती.
..............
फोटो
.......
गांधिनगर ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना विशाल पहुजा फाउंडेशनच्या वतीने रेनकोट वाटप प्रसंगी उपस्थित मान्यवर.
No comments:
Post a Comment