*नंदुरबार - ( प्रतिनिधी - वैभव करवंदकर ) : - - - - -* नंदुरबार येथील गजमल तुलसिराम पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य पदी ग. तु. पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विषयाचे जेष्ठ प्राध्यापक निलेश जमनादास सोमाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तत्पूर्वी त्यांनी भौतिक शास्त्र विषयाचे कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून 32 वर्ष सेवा त्यांनी केली आहे. मित भाषिक व एक अभ्यासु व्यक्तिमत्व म्हणून त्यांची समाजात व शैक्षणिक क्षेत्रात ओळख निर्माण केली आहे.
प्रा. एन. जे. सोमाणी सरांच्या उपप्राचार्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल नंदुरबार तालुका विधायक समितीचे अध्यक्ष मनोज रघुवंशी , संस्थेचे उपाध्यक्ष भारताचे माजी अडिशनल सॉलिसिटर जनरल राजेंद्र रघुवंशी व संस्थेचे संचालक माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी अभिनंदन केले. पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या आहेत . सोमाणी सरांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. श्रीवास्तव , उपप्राचार्य डॉ. एम. जे. रघुवंशी , उपप्राचार्य डॉ. आर. आर. कासार मावळते उपप्राचार्य प्रा. ए. के. शेवाळे यांचा उपस्थितीत सत्कार करण्यात आले. त्यानंतर सोमाणी सरांनी उपप्राचार्य पदाची सूत्रे स्वीकारली यावेळी उपस्थितांनी सोमाणी सरांनच अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच समाजातील सर्व स्तरावरून सोमाणी सरांना शुभेच्छा दिल्या जात आहे.
No comments:
Post a Comment