सैनिक टाकळी (प्रतिनिधी)
सैनिक टाकळी परिसरामध्ये सध्या लोकरी माव्याने डोके वर काढल्याने शेतकऱ्यांच्या संकटांमध्ये वाढ झाली आहे. ढगाळ वातावरण आणि हवामानातील सततच्या बदलामुळे ऊस पिकावर मोठय़ा प्रमाणावर लोकरी मावा रोगाचा फैलाव झाला आहे. परिणामी शेतकऱ्यांसाठी हुकमी व चांगल्या मोबदल्याचे पीक असलेल्या उसावर या नव्या संकटाने ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल असून, ऊसदर आणि अनंत अडचणींनी ग्रासलेल्या साखर उद्योगासमोर आणखी एक संकट उभे राहिले आहे. गतवर्षीच्या महापुरातून सावरलेल्या शेतकऱ्यांनी लॉकडाउनच्या काळामध्ये कष्ट करून उसाचे पीक जोमाने आणले आहे परंतु सध्या को 86032 या जातीच्या ऊसावरती मोठ्या प्रमाणावर लोकरी मावा आढळून येत आहे . या रोगाचे प्रमाण आडसाली ऊसावरती मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पिका वरती कीटकनाशक फवारणी करण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. याबाबतीत दत्त शेतकरी सहकारी कारखान्याचे शेती अधिकारी श्रीशैल हेगन्ना यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत शेतकऱ्यांना लोकरी मावा बाबत करावयाच्या उपाययोजना बद्दल माहिती सांगितली. यावेळी ते म्हणाले कोनोबाथ्रा ॲफिडीव्हारा अळया किंवा मायक्रोम इगोरोटास क्रायसोपर्ला कार्निया या मित्रकिटकां मुळे हा रोग नियंत्रणात येऊ शकतो या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असल्यास शेतकऱ्यांनी प्रतिलिटर क्लोरपायरीफॉस (२० टक्के इ.सी.) ०.७५ ते १.५ मि.लि. किंवा ॲसिफेट २ ग्रॅम. याची फवारणी घ्यावी या मुळे रोगा वरती नियंत्रण होऊ शकते. शक्यतो एकात्मिक कीडनियंत्रण केल्यास त्याचा लाभ होऊ शकतो .
No comments:
Post a Comment