Thursday, 2 July 2020

शाळा बंद.... शिक्षण चालू....शाहूवाडी तालुका शैक्षणिक व्यासपीठाचा उपक्रम


 माजगाव प्रतिनिधी:-

         कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशातील शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हे लक्षात घेऊन. महाराष्ट्रातील धैयवेढया,सामाजिक भान असणाऱ्या शिक्षकांनी 'शाहूवाडी तालुका शैक्षणिक व्यासपीठ'चे संस्थापक राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विनायक हिरवे यांच्या संकल्पनेनुसार विद्यार्थी शालेय वातावरणात रहावा या मुख्य उद्देशाने शाहूवाडी तालुका शैक्षणिक व्यासपीठ या शिक्षकांच्या सामाजिक व शैक्षणिक संस्थेने *विद्यार्थी मदत केंद्र* हा उपक्रम दिनांक १५/६/२०२० पासून शाहूवाडी तालुक्यासाठी सुरू करणेत आला आहे.या उपक्रमातून विद्यार्थी शालेय वातावरणात रहावा ,यासाठी प्रयत्न केला जात आहे.
           विद्यार्थी मदत केंद्रासाठी कार्यपद्धती:-

-इयत्तानिहाय शिक्षक कार्यकर्ते मार्गदर्शक म्हणून निवड होते.
-निवड झालेले ५ शिक्षक स्वतःच्या इयत्तेचा व्हाट्सएप ग्रुप तयार करून त्याची लिंक प्रसारित करतात.
-वर्षभर मुलांसाठी उपक्रम आयोजित करण्यात येतात.अभ्यास/व्हिडीओ/प्रश्नपत्रिका आदी स्वरूपात मार्गदर्शन होते.
-रोज सकाळी ७ ते ९ या वेळेत प्रत्येक इयत्ता व्हाट्स अप ग्रुपला अभ्यास/उपक्रम किंवा एखादी कृती करण्यासाठी सूचना दिल्या जातात.
-सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ग्रुप बंद राहील.
(Only for Admin) त्यांनतर संध्याकाळी ६ ते ८ यावेळेस मार्गदर्शक शिक्षक अभ्यास/उपक्रम या विषयी सूचना देतात.आणि पुन्हा ८ वाजता ग्रुप Only for admin असा केला जातो.
-अभ्यास तपासणीसाठी पालकांचे सहकार्य घेतले जाते.
-रात्री रोज एक बोधकथा सांगितली जाते.
         तसेच शालेय शिक्षण विभागाकडून प्राप्त शैक्षणिक उपक्रम ,सूचना विद्यार्थ्यांना व पालकांना देण्यात येतात.यासाठी शाहूवाडी तालुक्यातील ४० शिक्षक सहभागी आहेत.
याशिवाय अन्य तालुक्यातील/जिल्ह्यातील शिक्षक हे देखील या उपक्रमात सहभागी आहेत.५००० विद्यार्थी या उपक्रमात सहभागाची सहभागी झाले आहेत.
        यावेळेपर्यंत सहभागी शिक्षक-जयदीप डाकरे, दिनेश कांबळे,प्रकाश काळे,मीना मुळे, रेखा सुरवसे,पार्वती कुंभार,गोविंद देसाई,प्रवीण पिसे, सुषमा नागरगोजे , स्नेहल आयरे, महादेव जाधव,डॅनियल बारदेस्कर, भानुदास सुतार,विलास बंडगर, संजय जगताप,विजय गावडे,प्रदीप मुंडे,सतेश कांबळे, राहुल चौगुले, सपना सबनीस,विजयकुमार मोरबाळे, संभाजी लोहार,मैत्राली खटावकर,रोहिणी चिलकेवार,संगीता रणवरे,संगीता कोळी,सुनीता गुरव,अब्दुलगणी चौधरी, रोहित दिंडे,केशव मगर,प्रशांत मोहिते असे आहेत.
       याकरीता १ली ते ८वी च्या प्रत्येक इयत्तेसाठी किमान ५ व एकूण ४० शिक्षक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मार्गदर्शन करत आहेत.
       या उपक्रमाला गट विकास अधिकारी अविनाश वाघमारे व गटशिक्षणाधिकारी उदय सरनाईक,विस्तार अधिकारी सदाशिव थोरात यांचे मार्गदर्शन लाभले.

1 comment: