Monday, 13 July 2020

कंदलगावात वाढीव वीज बिलांची किसान सभेतर्फे होळी ...

कंदलगाव ता .१३ ,
       प्रशासनाकडून लॉक डाऊन काळातील वीजबिले माफ करण्याची घोषणा केली होती . मात्र वीज मंडळाकडून या आदेशाकडे दुर्लक्ष होत असून या काळातील मीटर रिडींग न घेता ग्राहकांना भरमसाठ बिले देऊन नागरीकांच्या तोडंचे पाणी पळविले असल्याचे आखील भारतीय किसान सभेचे नामदेवराव गावडे यांनी म्हटले आहे .
    ते कंदलगाव येथे आयोजीत केलेल्या वीज बिलांची होळी या आंदोलनावेळी बोलत होते .
     यावेळी कॉ . वाय .एन. पाटील , कॉ . बाळू पाटील , कॉ . वसंतराव पाटील , रंगराव निर्मळ , यशवंत हिंदळे , शामराव निर्मळ यांचे सह नागरीक व ग्रामस्थ उपस्थित होते .

फोटो  - कंदलगाव येथे किसान सभेच्या वतीने वाढीव वीज बिलांची होळी करण्यात आली त्यावेळी नामदेवराव गावडे , वसंतराव पाटील यांचे सह इतर मान्यवर .
( छायाचित्र - प्रकाश पाटील )

No comments:

Post a Comment