Tuesday, 4 August 2020

यावर्डीचे विद्यार्थी घेत आहेत विविध तज्ञ शिक्षकांचे ऑनलाईन मार्गदर्शन

प्रतिनिधी आरिफ़ पोपटे


 प्राचार्य अरुण लौटे, जिल्हा समुपदेशक राजेश सुर्वे यांचे मार्गदर्शन

ग्रामीण भागातील विध्यार्थी घेत आहेत ऑनलाईन मार्गदर्शन

कारंजा प्रतिनिधी/०४ जुलै २०२०

कारंजा-

कोरोना महामारी मुळे प्रत्यक्ष  शाळा सुरू झाल्या नाहीत म्हणून विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने शिक्षण देण्यात यावे,असे शासन व शिक्षण विभागाकडून निर्देश देण्यात आलेत. त्यानुसार मुख्याद्यापक विजय भड यांचे मार्गदर्शनात ग्राम यावर्डी येथील बाबासाहेब धाबेकर विद्यालयातील विद्यार्थ्यांना ११ जुलै पासून गुगल मीट या अँप्सद्वारे ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू आहे. सदर शाळा येथेच न थांबता विद्यार्थ्यांसाठी  शिक्षणासोबत तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन आयोजित करत आहे.यामध्ये जिल्हा समुपदेशक राजेश सुर्वे यांनी "कुमारवयीन मुलांना समजून घेतांना" या विषयावर तर प्राचार्य अरुण लौटे यांनी "बेसिक इंग्लिश ग्रामर" याबाबत ऑनलाईन पध्दतीने मार्गदर्शन केले.
              दिनांक ०२ ऑगस्ट रोजी जागृती विद्यलय अकोला चे प्राचार्य तथा यशदाचे मास्टर ट्रेनर अरुण लौटे यांनी सकाळी ८:३०ते १०:३० या वेळात "बेसिक इंग्लिश ग्रामर" मध्ये पार्ट ऑफ स्पीच बाबत सविस्तर ऑनलाइन मार्गदर्शन केले.यावेळी सदर क्लासला ६१ विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. त्याआधी दिनांक २८ जुलै रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वाशिमचे जिल्हा समुपदेशक राजेश सुर्वे यांनी सायंकाळी ६:१५ ते ७:३० वाजेपर्यंत "कुमारवयीन मुलांना समजून घेतांना" याबाबत सविस्तर ऑनलाईन पध्दतीने मार्गदर्शन केले. यावेळी ४७ विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
        विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन केल्याबद्दल दोन्ही मार्गदर्शन तज्ञाचे मुख्याध्यापक विजय भड यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गोपाल काकड यांनी केले. सदर ऑनलाईन मार्गदर्शन वर्गाला शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सम्पूर्ण तालुक्यात कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment