Tuesday, 4 August 2020

श्रीराम जन्मभुमी पायाभरणी निमित्त दिपोस्तव साजरा करावा - भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांचे आवाहन

       नंदुरबार -  ( प्रतिनिधी - वैभव करवंदकर ) - - - - -*                                        

अयोध्या प्रभु श्रीराम जन्मभुमी मंदीराच्या पायाभरणी समारंभ आज बुधवारी साजरा होत असुन सर्व नागरीकांनी दिपोस्तव साजरा करावा असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केले आहे. ऐतिहासिक क्षण साजरा करत असतांना कोरोनाच्या साथीचे भान ठेवुन कार्यक्रम करावा असे प्रसिध्दीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.
    यावेळी जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी सांगितले की, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या आदेशान्वये सर्वांनी आज दि.05 ऑगस्ट बुधवार रोजी घरावर रोषणाई करावी, गुढी उभारावी, दिवाळीप्रमाणे आकाशकंदील लावावा, घरासमोर पणत्या लावाव्यात आणि रांगोळी काढावी, तसेच घरी आर्वजुन गोडाचे पदार्थ करावेत, घरामध्ये सर्व कुटुंबियांसोबत टिव्हीवर भुमिपुजनाचा कार्यक्रम पहावा आपण वैयक्तिक पातळीवर केलेल्या उत्सवाचे फोटो सोशल मिडीयावर प्रसिध्द करुन आपल्या मित्रांसोबत आनंद व्दिगुणित करावा. असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केले आहे.
    
अयोध्या येथे श्रीराम जन्मभुमी पुजनाच्या ऐतिहासिक सोहळया निमित्त भाजपाच्या कार्यालयावर विदयुत रोषणाई व पुर्वसंध्येला पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे श्रीराम मंदिराचे शुभेच्छा फलक सर्वांचे लक्ष वेधुन घेत होते.


भाजपाच्या लढयाला मोठे योगदान  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथे श्रीरामजन्मस्थानी भव्य मंदिराचा पायाभरणी समारंभ होत आहे. अयोध्येत रामजन्मस्थानी मंदिर व्हावे, हे स्वप्न साकारत आहे. एक प्रदीर्घ लढा सफल होत आहे. भारतीय जनता पार्टीचे या लढयात मोठे योगदान आहे. श्रीराम मंदिर आंदोलनात आपल्यापैकी अनेक कार्यकर्ते अनेक कार्यकर्ते सक्रीय सहभागी झाले. आपल्या आयुष्यातील हा ऐतिहासिक दिवस आहे. आनंद साजरा करतांना सर्वांनी कोरोनाच्या साथीमुळे असलेले निर्बंध – मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्सिंग योग्य रितीने पाळावेत. 

- विजय चौधरी,भाजपा जिल्हाध्यक्ष

No comments:

Post a Comment