कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री ना. सतेज पाटील यांनी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयाला भेट देऊन आढावा घेतला. यावेळी, कोरोना रुग्णांची सद्यस्थिती आणि नियोजन यावर डॉक्टरांशी चर्चा केली. सीपीआर रुग्णालयामध्ये सध्या सध्या एकूण ४०० बेड्सची व्यवस्था आहे, त्यामध्ये ऑक्सिजनयुक्त १०४ बेड्स आहेत.
आज ४० ऑक्सिजनयुक्त बेड्स नव्याने उपलब्ध करण्यात आले असून येत्या ४ ते ५ दिवसांमध्ये अजून ८० ऑक्सिजनयुक्त बेड्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
तसेच इमरजेंसीसाठी ८ बेड्स राखीव असून कोणत्याही परिस्थितीमध्ये रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून तात्काळ उपचार सुरु करण्याच्या सूचना यावेळी रुग्णालय प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. अशी माहिती ना. सतेज पाटील यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment