Sunday, 6 September 2020

पत्रकारांना 50 लाखांचे विमाकवच देण्याचा निर्णय घेणार : ना. टोपे



केंद्रिय पत्रकार संघाच्या पाठपुराव्याला अखेर यश

रजनिकांत वानखडे 
वाशिम प्रतिनिधी 

मा. संदिप कसालकर राष्ट्रीय अध्यक्ष , कमलेश गायकवाड राष्ट्रीय उपाध्यक्ष, सचिन बोंबले महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष 
केंद्र सरकारच्या नियमानुसार पोलिस, डॉक्टर, यांना कोरोना कालावधीत  सेवा देताना मृत्यू झाल्यास, संबंधितांच्या नातेवाईकांना 50 लाख रूपयांचे विमा कवच दिले जात आहे. आता पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाल्याने पत्रकारांना देखिल 50 लाख रूपयांचे विमा कवच देण्याबाबत आगामी मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा करून निर्णय घेतला जाईल अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज पुण्यात  दिली. 
केंद्रिय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष कमलेश गायकवाड, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सचिन बोंबले यांनी पत्रकारांच्या या मागणीसाठी  राज्य सरकारकडे तसेच मुख्यमंत्री आरोग्य मंत्री यांच्याकडे लेखी निवेदन देऊन मागणी केली असता या मागणीला तसेच पाठपुराव्याला अखेर यश आले.
माननिय ना श्री राजेशजी टोपे आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य 
यांनी पत्रकारांना 50 लाख रुपयांचे विमाकवच मिळवून देण्याचे कबूल केले आहे.
या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो 
माननिय आरोग्यमंत्री श्री राजेशभय्या टोपे यांनी   तिव्रगतीने तातडीने घेतलेल्या निर्णया बद्दल त्यांचे विशेष आभार व्यक्त करतो !!!
व 
आमच्या मृत पत्रकारबांधवाना शासनाकडून मदत देऊन 
त्यांच्या कुंटुबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरीत सामील करुन घेऊन 
त्यांच्या कुंटुबातील भविष्यकाळातील ओढातान होणार नाही 
या संदर्भास कार्यवाही करावी 
अशी  मराठवाड्यातील भुमीपुत्रांस विनंती करत आहोत !
  आज टोपेसाहेबांमुळे आमची एक मागणी
 आज पूर्ण होताना दिसत आहे !

ही न्याय मागणी लोकशाही मार्गाने 
व शासनाच्या सहकार्याने होत आहे
याचे संपूर्ण श्रेय 
महाराष्ट्रातील केंद्रीय पत्रकार संघाच्या 
कार्यकारीणीतील सर्वच पदाधिकारी सदस्यांचे 
एकीचे व एकजुटीचे च फळ आहे 
केंद्रीय पत्रकार संघाच्या  कार्यकारीणीतील सर्वच पदाधिकारी व सदस्यांचे 
आहे

No comments:

Post a Comment