मुंबई प्रतिनिधी:-
जिल्हा परिषदेच्या मार्फत दारिद्रय रेषेखालिल वैयक्तिक लाभाच्या उत्पन्न मर्यादीत दोन लाख रुपयाची वाढ करावी अशी महाराष्ट्र राज्याचे महिला व बाल विकासमंञी यशोमती ठाकुर यांच्याकडे मुंबईत भेटून मागणी लातुरचे जिल्हापरिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी मुंबईमधे भेट घेऊन केली आहे.
दारिद्रय रेषेखालील गोरगरीब जनतेसाठी विविध योजना अमलात आसुन सदरील योजना काही तांत्रिक बाबीमुळे मंजूर योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मीळत नाही.यामुळे प्राप्त निधी परत जात आहे.यातील एक महत्वाची अडचन म्हणजे लाभार्थ्याच्या लोकांची वार्षिक उत्पन्न हे पंन्नास हजार असायला पाहीजे तर लाभार्थी यांना मंजुर योजनेचा लाभ मिळतो पण मजुरांची वार्षिक मजुरी पहाता ते जास्त होताना दिसत आहे त्यामुळे गोर गरिब नागरीकांना संबंधित तहसील कार्यालय येथुन पन्नास हजार रुपये उत्पन्नाचे प्रमाण पत्र मिळणे अवघड होत आहे.यामूळे रोजगारिचा विचार करता व लाभ मिळत नसल्यामूळे या बाबीचा विचार करुन लातुरचे जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन सर्वानुमते हा लाभाच्या उत्पन्नमर्यादेत वाढ करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आसुन यात किमान मर्यादा वाढवून 1.5 लाख ते 2 लाख करण्यात यावी. व सदरील मंजूर ठरावा संदर्भात महाराष्ट्र राज्याचे महीला बालविकास मंत्रालय मुंबई येथे नामदार यशोमती ठाकुर यांना भेट घेऊन याबाबत त्यांचा सोबत चर्चा करून सर्व सामाण्य नागरीकांना ज्या अडचणी येत आहेत त्या अडचणीसंदर्भात मंत्री महोदय यांच्या समोर मांडण्यात आल्या.
महिला व बाल विकासमंञी यशोमती ठाकुर यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांना सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याने महाराष्ट्र राज्यातील दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी यांचे उत्पादनवाढीची मर्यादा वाढणार आसल्याने या लाभाच्या योजनेचा फायदा दारिद्रय रेषेखालील जनतेना होनार आहे.आशा प्रकारे दारिद्रयरेषेखालिल जनतेच्या हितासाठी मागणी करणारी ही पहिली जिल्हा परिषद ठरली आहे .यामूळे या मागणीचा सर्वसामान्य जनतेचा फायदा होनार आसुन यापुढे लाभापासुन वंचित राहनार नाहीत. यावेळी लातूर जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती यांचे प्रतिनिधी म्हणून जेष्ठ नेते बापूराव राठोड हे ही उपस्थित होते.
No comments:
Post a Comment