कोल्हापूर दि.03 :
महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीकडील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी यांना 7 वा वेतन आयोग लागू करणे संदर्भात मा. महानगरपालिका सर्वसाधारण सभेत यापूर्वी ठराव झालेला आहे. तथापि, अद्याप वेतन आयोग लागू झाला नसलेने कोल्हापूर महानगरपालिका शिक्षक संघटना कृती समितीने शिक्षक दिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचे निवेदन मा. आयुक्तसोा, को.म.न.पा. व प्रशासनाधिकारी, प्राथमिक शिक्षण समिती यांना दिले. या निवेदनाची दखल घेवून कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती, महानगरपालिका, कोल्हापूर कडील शिक्षकांना 7 वा वेतन आयोग लागू करणे संदर्भात आज मा. डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, आयुक्त, को.म.न.पा. यांचे अध्यक्षतेखाली प्राथमिक शिक्षण समितीकडील विविध शिक्षक संघटना व सेवा निवृत्त संघटना पदाधिकारी यांचे उपस्थितीत तातडीने बैठक घेणेत आली.
शिक्षकांना वेतन आयोग करावा यासाठी मा. नाम. सतेज उर्फ बंटी डी. पाटील, नामदार हसन मुश्रीफ, महापौर निलोफर आजरेकर, उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती सचिन पाटील, शिक्षण समिती सभापती श्रावण फडतारे, गटनेते शारंगधर देशमुख, भूपाल शेटे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, मुख्य लेखाधिकारी धनंजय आंधळे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक यांचे सहकार्य लाभले.
7 वा वेतन आयोग लागू करणे संदर्भात आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी संघटना पदाधिकाऱ्यां बरोबर चर्चा करुन प्राथमिक शिक्षण समिती, महानगरपालिका, कोल्हापूर कडील शासन मान्य शिक्षकांना 7 वा वेतन आयोग माहे सप्टेंबर पेड इन आक्टोंबर 2020 पासून लागू करणेचा निर्णय घेतला.
या प्रसंगी प्राथमिक शिक्षण समिती, महानगरपालिका, कोल्हापूरचे प्रशासनाधिकारी शंकर यादव, लेखापाल राजीव साळोखे, सुर्यकांत ढाले, अजय गोसावी तसेच प्राथमिक शिक्षक व सेवानिवृत्त संघटना कडील वसंतराव चव्हाण, करीम मुजावर, सुधाकर सावंत, विलास पिंगळे, मनोहर सरगर, संजय पाटील, सुनिल गणबावले, उमेश देसाई, अजितकुमार पाटील,द्रोणाचार्य पाटील, दिलीप माने, विजय सुतार, संतोष बांबळे, संजय कडगांवे, विनोदकुमार भोंग, शिवाजी गुरव, संदीप सुतार,राजेंद्र पाटील उपस्थित होते. प्राथमिक शिक्षक संघ, पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना, सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक समिती व कोल्हापूर महानगरपालिका शिक्षक संघटना कृती समितीच्या वतीने सर्वांचे आभार मानले.सातव्या वेतन आयोगासाठी गेले वर्षभर सातत्याने पाठपुरावा करणारे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य अध्यक्ष मा राजाराम वरुटे सर, नामदेव रेपे सर, संभाजी बापट,तसेच राज्यप्रतिनिधी यांनी मंत्रालयात शासन दरबारी निवेदन देऊन पाठपुरावा केला होता.
No comments:
Post a Comment