पट्टणकोडोली (साईनाथ आवटे) :
हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली शहरात कोरोनाने धुमाकूळ घालून शंभरीचा टप्पा ओलांडला आहे. गावामध्ये दिवसेंदिवस रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने सामाजिक संघटना, संस्था, ग्रुप, मंडळे, व्यापारी व सुज्ञ नागरीक यांनी कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यूची मागणी ग्रामपंचायतीकडे केली होती. या मागणीनुसार सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य यांनी ताबडतोब मिटिंग घेऊन मंगळवार.8 ते 12 सप्टेबर पर्यंत पाच दिवसाचा जनता कर्फ्यू लागू करणार असल्याची माहिती दिली.
अत्यावश्यक सेवा असलेल्या बँका, पतसंस्था कार्यालये पाच दिवस बंद ठेवणे योग्य नसल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
या बाबत बोलताना उपसरपंच कृष्णात मसुरकर म्हणाले की शासनाच्या नियमांचे उल्लंघन न करता सामाजिक बांधिलकी जपत कोरोना या विषाणूचा संसर्ग प्रादुर्भाव रोखणेसाठी ग्रामपंचायत प्रशासनाचे वतीने कडक नियमांचे फलक लावणे, चौका चौकात गाडी लावून नियमावली सांगण्यात येईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीररित्या दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशा विविध उपाययोजना केल्या जाणार आहेत.
पट्टणकोडोली शहरामधील सर्व प्रभागामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होऊन समुह संसर्गा मध्ये वाढ होत असलेचे दिसुन येत असलेमुळे शहरामधील सामाजीक संघटना, संस्था, मंडळे, व्यापारी व नागरीक यांनी कोरोना संसर्गामध्ये वाढ होत असलेली साखळी तोडणेसाठी शहरामध्ये जनता कफर्यू लागू करुन संपूर्ण व्यवहार बंद ठेवणे गरजेचे असल्याबाबतच्या प्रतिक्रीया व्यक्त केल्या.त्यास अनुसरुन शहरामधील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व व्यवहार बंद ठेवून सहकार्य करण्याचे आवाहन केले.
:- ग्रामसेवक हे सरपंच उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य यांना कोणत्याही प्रकारचे सहकार्य करत नाहीत.महत्वाच्या मिटींगना हजर राहत नाहीत त्यामुळे त्यांच्या कार्य पद्धती बदल वरीष्ठांकडे तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे उपसरपंच मसूरकर यांनी सांगितले.त्याला उपस्थित नागरिकांनी पाठिंबा दिला.
No comments:
Post a Comment