उदगीर प्रतिनिधी :- गणेश मुंडे वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डाॅ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांना उदगीर सत्संग मंडळाच्या वतीने वृक्षारोपण करून श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे मंगळवार दिनांक एक सप्टेंबर2020 रोजी शरीर त्याग करून शिवैक्य झाले.राष्ट्रसंत गुरुमाऊली यांचे उदगीर व परिसरातील भक्तावर निस्सीम प्रेम होते.सत्संग,शिवनाम सप्ताह, परमरहस्य पारायण,शिवदिक्षा समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज उदगीर येथे येत असत सत्संग महिला मंडळाच्या वतीने उदगीर येथे एकूण 96 सत्संगाचे आयोजन करण्यात आले सत्संगाच्या माध्यमातून आपल्या आशीर्वादातून परमपूज्य राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी अमृत उपदेश दिला आहे.गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी नळेगाव रोड उदगीर येथील परमेश्वरी मंगल कार्यालयात श्री गुरु हावगीस्वामी मठाचे मठाधीश डॉ. शंभूलिंग शिवाचार्य महाराज यांच्या उपस्थितीत सकाळी अकरा वाजता जंगम अर्चना व दुपारी एक वाजता वृक्षारोपण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या नियम व सूचनांचे पालन करून श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सर्व भक्त मंडळींनी श्रद्धांजली कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन सत्संग मंडळाच्या अध्यक्षा शि.भ. प.शिलाताई मालोदे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment