हेरले / प्रतिनिधी
दि.2/9/20
हेरले (ता हातकणंगले)येथे कम ऑन इंडिया मित्र मंडळा मार्फत सलग गेली तीन वर्षे गणेश चतुर्थी निमित्त रक्ताची कमतरता दूर करणेसाठी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.
मंडळाचे आधारस्तंभ सचिन थोरवत श्रीमूर्ती देणगीदार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रक्तदान शिबिराची सुरवात करण्यात आली.या रक्तदान शिबीरात ४० रक्तदात्यांनी रक्तदान केल. प्रत्येक रक्तदात्याला एक जेवणाचा डबा व प्रमाणपत्र देण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे डॉ प्रविण भोसले,उपसरपंच राहुल शेटे,ग्रामपंचायत सदस्य रणजीत इनामदार, दादासो कोळेकर अध्यक्ष संदीप मुंडे, उपाध्यक्ष संतोष सुरवसे,किशोर पाटील,विजय चव्हाण,कुलदीप सुतार,किशोर पाटील,अभिजित लोखंडे, कुबेर मुंडे, सयाजी गायकवाड यांनी स्वागत व प्रस्ताविक तर आभार महावीर वळीवडे यांनी केले. या प्रसंगी मंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते.
फोटो
हेरले येथील कम ऑन इंडिया मित्र मंडळाच्या रक्तदान शिबीरातील रक्तदात्यांना प्रमाणपत्र प्रदान करतांना उपसरपंच राहूल शेटे व इतर मान्यवर.
No comments:
Post a Comment