Wednesday, 2 September 2020

शिक्षक दिनावर महापालिका शिक्षकांचा बहिष्कार

*

 5 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय शिक्षक दिवस म्हणून देशभर मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. परंतु महानगरपालिका प्राथमिक शिक्षकांबाबत वेळोवेळी दुजाभाव होत असून या सर्व गोष्टीचा निषेध म्हणून महानगरपालिका शिक्षक संघटना कृती समिती कोल्हापूर मार्फत यावर्षीच्या राष्ट्रीय शिक्षक दिनावर बहिष्कार टाकण्यात येणार आहे.
  राज्यभरातील जिल्हा परिषद,  खाजगी शाळा,  आदिवासी विभागातील शाळा समाज कल्याण विभागातील शाळा विशेष मुलांच्यासाठी च्या शाळेतील सर्व शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू आहे मात्र महानगरपालिका शिक्षक यापासून वंचित आहेत . ही बाब  महानगरपालिका शिक्षकांच्याबाबत मोठी अन्यायकारक आहे. महानगरपालिका शिक्षकांच्या निवड श्रेणी, वरिष्ठ वेतन श्रेणी, विषय शिक्षक शैक्षणिक  पर्यवेक्षक व मुख्याध्यापक पदोन्नती या व अश्या अनेक न्याय  मागण्या ह्या बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहेत. यावर्षीच्या थँक  अ टीचर या उपक्रमांमध्ये सुद्धा शालेय शिक्षण विभागाने जाणीवपूर्वक महानगरपालिका शिक्षकांचा उल्लेख टाळलेला आहे.  त्याचबरोबर कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्यावर तीव्र आंदोलन करण्याचा ही मानस महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती,  महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितिने व्यक्त केला आहे.कृती समन्वय समितीचे विलास पिंगळे, संजय पाटील, दिलीप माने , विजय सुतार, वसंत आडके,सुभाष धादवड,विनोद भोंग,अजितकुमार पाटील इत्यादी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment