पेठवडगांव / प्रतिनिधी
दि.23/9/20
कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाने कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढ होत आहे. हा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कोल्हापुरात कायमस्वरूपी वैद्यकीय सुविधा निर्माण करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन कोल्हापूर जिल्हा आपत्ती निवारण निधीस द्यावे असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.सतेज डी.पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्यावतीने आयोजित बैठकीत केले. अध्यक्षस्थानी शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस.डी.लाड यांनी केले. यावेळी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी बोलताना नाम.पाटील म्हणाले, जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्राच्या वतीने कायमस्वरूपी वैद्यकीय सुविधा निर्माण झाल्यास ते राज्य नव्हे देशाच्या दृष्टीने पथदर्शी ठरेल. यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य, गोरगरीब जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी हातभार लागणार आहे. यावेळी पालकमंत्र्यांनी केलेल्या आवाहनास सर्व संघटनांनी प्रतिसाद दिला. याबाबत नियोजनासाठी शुक्रवारी संघटना प्रतिनिधींची बैठक घेण्याचेही ठरले.
यावेळी शिक्षण संस्थाचालक संघाचे अध्यक्ष वसंतराव देशमुख, मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ, संस्थाचालक संघाचे सचिव प्रा.जयंत आसगावकर, शिक्षक भारतीचे विभागीय अध्यक्ष दादा लाड, कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबा पाटील, पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, प्रभाकर हेरवाडे, मुख्याध्यापक महामंडळाचे व्ही.जी.पोवार, मुख्याध्यापक संघाचे सचिव दत्ता पाटील, मिलिंद पांगिरेकर, प्रा.सुभाष जाधव, प्रा.सी.एम.गायकवाड, राजेश वरक, शिवाजी माळकर, शिक्षक समितीचे सुधाकर सावंत, के.एस.कारंडे, गजानन काटकर, उदय पाटील, के.के.पाटील, मनोहर जाधव, प्रशांत पोवार, मोहन भोसले, पंडीत पवार, इरफान अन्सारी, सूर्यकांत चव्हाण यांच्यासह संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment