हातकणंगले / प्रतिनिधी
प्रशांत तोडकर
हातकणंगले तालुक्यातील हेरले प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या आरोग्य मोहिमे अंतर्गत सहा गावामध्ये ६५० कुटुंबामधील २९६६३ लोकसंख्येचा सर्वे झालाआहे. यामध्ये ६२ संशयित रुग्णांचा स्वॅब तपासला त्यापैकी तीन कोरानाचे रूग्ण सापडल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. १ ऑक्टोबंरपासून मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांच्या मार्गदर्शन्वये 'विशेष आरोग्य मोहिम' सुरू होईल. या मोहिमेतंर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणी केली जाणार असल्याची माहिती प्रसिद्धीस वैद्यकिय अधिकारी डॉ. राहुल देशमुख यांनी दिली.
कोराना महामारीचा समुह संसर्गचा प्रादूर्भाव हेरले, रूकडी, माले ,मुडशिंगी ,चोकाक, अतिग्रे आदी सहा गावांमध्ये होऊन आजपर्यंत ३९९ कोरोना रुग्ण आढळले त्यापैकी ३१७ रुग्णांवर उपचार होऊन डिस्चार्ज मिळाला,१७ जणांचा मृत्यू झाला आहे . उपचार घेत असलेले ६५ रूग्ण पैकी ४१घोडावत कोवीड सेंटर , सीपीआरमध्ये चार, खाजगी दवाखाण्यात ९ तर घरी ११उपचार घेत आहेत.
हेरले प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत कोरोना समुह संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाची माझे कुटुंब माझी जबाबदारी आरोग्य मोहिम सुरू आहे. १५ सप्टेबंरपासून आशा - स्वयंमसेविका ,अंगणवाडी सेविका , स्वंयमसेवक या तीन जणांच्या गटाकडून दररोज ५० घरांचे सर्वेक्षण सुरू आहे. आज पर्यंत सहा गावांमध्ये ६५० कुटुंबामधील २९६६३ लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे. यामध्ये ६२ संशयितांचे स्वॅब घेतले गेले त्यापैकी ३ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
आरोग्य मोहिमे अंतर्गत सर्वेक्षणामध्ये प्रत्येक कुटुंबाचे सर्दी ,ताप ,खोकला, किडणी विकार, लठ्ठपणा, मधुमेह, रक्तदाब आदी शारिरीक त्रासाबद्दल विचारपुस केली जाते.गरोदर माता, दहा वर्षाखालील मुले व साठ वर्षावरील व्यक्तीं आदीसह कुटुंबांतील सर्व सदस्यांचे ऑक्सिजन प्रमाण व तापमान नोंद करून' माझे कुटुंब माझी जबाबदारी ' या अॅपमध्ये माहिती भरली जात आहे. या सर्वेतील संशयित रुग्णांची यादी त्या गावातील तलाठी व ग्रामविकास अधिकाऱ्यांना दिली जात आहे. ते त्यांना स्वॅब तपासणीसाठी कोवीड सेंटरमध्ये पाठवत आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्वतंत्र ताप उपचार केंद्र विभाग सुरू केला असून दररोज जास्त ताप असणाऱ्यांची तपासणी केली जात आहे. तसेच नॉन कोवीडमध्ये दमा, संडास उल्टी, अशक्तपणा, मधुमेह, सांधेदुखी, रक्तदाब, अंगदुखी आदींनी त्रस्त असणाऱ्या रुग्णांची वैद्यकिय तपासणी करून उपचार सुरू आहेत. या आरोग्य मोहिमेमध्ये आरोग्य सहाय्यक व्ही.बी. वर्णे ,उदय कांबळे, आरोग्य सेवक, सेविका, आशा स्वयंमसेविका, अंगणवाडी सेविका आदी कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत.
या मोहिमेस महिला व बालकल्याण समिती सभापती डॉ. पद्माराणी पाटील माजी सभापती राजेश पाटील, पंचायत समिती सदस्या महेरनिगा जमादार, पोलीस पाटील नयन पाटील, सरपंच अश्विनी चौगुले, उपसरपंच राहुल शेटे, ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण, माजी उपसरपंच विजय भोसले ,संदिप चौगुले, मुनीर जमादार तलाठी एस. ए. बरगाले आदींसह पाच गावातील सरपंच ,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामविकास अधिकारी, कोराना सनियत्रंण समितीचे सहकार्य लाभले आहे.
आरोग्य मोहिमेतंर्गत सर्वेसाठी आपल्या प्रत्येकाच्या घरी येणाऱ्या आरोग्य पथकास नागरिकांनी कुटुंबांतील सर्व व्यक्तींच्या आरोग्याची योग्य आणि खरी माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन वैद्यकिय अधिकारी डॉ. राहुल देशमुख यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment