Tuesday, 29 September 2020

नेशन बिल्डर अवॉर्डने दिपक शेटे सन्मानित

प्रतिनिधी सतिश लोहार


स्वातंत्र्यसैनिक मारुती गणपती पाटील आदर्श विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज मिणचे या शाळेतील सहाय्यक शिक्षक दिपक मधुकर शेटे यांना रोटरी क्लब कोल्हापूर यांच्यावतीने नेशन बिल्डर अवॉर्ड 2020 डिस्ट्रिक्ट गवर्नर संग्राम पाटील यांच्या हस्ते प्रधान करण्यात आला .
दिपक शेटे हे गेली वीस वर्ष गणित अध्यापनाचे कार्य करत आहेत त्यांच्या शाळेचा दहावीचा गणित विषयाचा निकाल अत्यंत उत्कृष्टपणे दर वर्षी लागतो . त्यांनी गणिताची सात पुस्तके व दोन नाटके लिहिले आहेत . दिपक शेटे हे गणितात विविध उपक्रम राबवत असतात त्यांची उपक्रमशील शिक्षक म्हणून सुद्धा वेगळी ओळख आहे . सुमारे सतरा लाख रुपयाची स्वतःची गणित प्रयोग शाळा आहे त्याचा लाभ राज्यातील गणितप्रेमी घेत आहेत . त्यांनी राज्यस्तरावर तज्ञमार्गदर्शक म्हणूनही काम केले आहे . शिक्षणातील तार्‍यांचा शोध घेण्याकरिता त्यांनी स्टार अकॅडमी नावाची संस्था स्थापन करून दरवर्षी शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करतात .गेली सात वर्षे हा सोहळा निरंतर सुरू आहे .कोरोना महामारी काळात सुद्धा त्यांनी स्टार कोरोना योद्धा पुरस्कार देऊन कोरोना योद्धांना सन्मानित करून प्रोत्साहित केलेले आहे . दहावीची गणित पुस्तक एका पानात  तयार करणारे तंत्रस्नेही दीपक शेटे यांनी कोरोना काळात त्यांनी मॅचस्टार व स्टार अकॅडमी न्यूज चैनल सुरु केले .याचा उपयोग शालेय विद्यार्थी करत आहेत.कोरोना काळातही त्यांनी कोरोना योद्धाची भूमिका आपल्या उपक्रमातून दाखवून दिली आहे .त्यांच्या या कार्याची दखल विविध दैनिके ,राष्ट्रीय न्यूज चैनल , रेडिओ इत्यादी माध्यमांनी घेतला आहे . गणिताचे सर्वात शास्त्र उपक्रम राबवणारे शिक्षक म्हणून महाराष्ट्र बुक रेकॉर्डमध्ये त्यांची नोंद आहे .त्यांना आजअखेर एक राष्ट्रीय व 17 इतर पुरस्कारांनी सन्मानित केले आहे .त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला .त्यांना प्राचार्य डी एस घुगरे उपप्राचार्य एम ए परीट यांचे प्रोत्साहन व सहकारी शिक्षकवृंदाचे सहकार्य लाभले .यावेळी रोटरी क्लबच्या अध्यक्ष शिरगावे मॅडम ,डॉक्टर कुलकर्णी ,सौ मोहिते मॅडम ,सौ .उत्कर्ष।पाटील , सुधाकर निर्मळे आदी मान्यवर उपस्थित होते . त्यांचे शैक्षणिक वर्तुळात कौतुक होत आहे .

No comments:

Post a Comment