कोल्हापूर / प्रतिनिधी
माध्यमिक शाळेतील इयत्ता पाचवीचे वर्ग जोडण्यासाठी कोल्हापूर जिल्हयातील मुख्याध्यापकांनी तथा प्राचार्यांनी आपल्या शाळेची माहिती भरावी असा आदेश माध्यमिक शिक्षण अधिकारी यांनी दि. २५ सप्टेबंर रोजी काढला. ही माहिती न भरणाऱ्या मुख्याध्यापक, प्राचार्य व लिपीक यांचे सप्टेबंरचे वेतन स्थगित करण्यात येईल असे या आदेशात म्हंटले आहे.
या आदेशा विरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला. या आदेशातील शिक्षणाधिकाऱ्यांचा धमकी वजा आदेशाचा निषेध करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाची सभा मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवन येथे संपन्न झाली. अध्यक्षस्थानी एस डी लाड होते.
या बैठकीमध्ये १ ऑक्टोबंर रोजी दुपारी १ वाजता माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या विरोधात जिल्हा परिषदेसमोर तीव्र निदर्शने करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. दि. १६ सप्टेबंरचा इयत्ता पाचवीचा वर्ग प्राथमिक शाळांना जोडण्याबाबतचा आदेश शालेय शिक्षण विभागाने रद्द करावा यासाठी दि. २ ऑक्टोबंर रोजी व्यासपीठाच्या वतीने पालकमंत्री नामदार सतेज पाटील यांना निवेदन देण्यात येणार आहे.
या वेळी चेअरमन सुरेश संकपाळ, सचिव दत्ता पाटील, शिक्षण संस्थाचालक संघ अध्यक्ष वसंतराव देशमुख , सचिव प्रा. जयंत आसगावकर, बाबासाहेब पाटील, सुधाकर निर्मळे, पी. एस. हेरवाडे, शि. ना. माळकर, प्रा.एन. आर. भोसले, प्रा.सी.एम. गायकवाड ,के. के .पाटील, उदय पाटील, प्राचार्य डॉ.व्ही.एम. पाटील, ए. ए. अन्सारी, मिलींद बारवडे, काकासाहेब भोकरे, शिवाजीराव कोरवी,रवी मोरे, बी.एस. खामकर,राजेश वरक, जितेंद्र म्हैशाळे, जगदिश शिर्के, गजानन काटकर, आर. डी. पाटील, पंडीत पवार, एम. व्ही. जाधव, अशोक हुबाळे ,एस. एस. चव्हाण, चंद्रकांत लाड,माजीद पटेल आदी शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो
कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या सभेत बोलतांना अध्यक्ष एस डी लाड शेजारी इतर मान्यवर.
No comments:
Post a Comment