हेरले / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळच्या ) पशुसंवर्धन व संकलन विभागातील कर्मचाऱ्यांना ५ लाखाची मेडिक्लेम पॉलिसी देण्यात आली आहे . या पाॅलिसीचा संपूर्ण रक्कमेचा धनादेश संघाचे चेअरमन रविंद्र आपटे यांच्या हस्ते कंपनीस देणेत आला.
गोकुळच्या पशुसंवर्धन व संकलन विभागातील कर्मचाऱ्यांनी एस.बी.आय. जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत ५ लाखाची ग्रुप मेडिक्लेम पॉलिसी घेतली आहे. या पॉलिसी सोबतच २० लाख रुपये विमा संरक्षण असलेली अपघाती विमा पॉलिसीदेखील घेणेत आली आहे. या पॉलिसीचा विमा हप्ता गोकुळ दूध संघामार्फत अॅडव्हान्स रूपाने गोकुळचे चेअरमन रविंद्र आपटे यांचे हस्ते एस.बी.आय. बँकेचे शाखा व्यवस्थापक श्री चोपडे, एस.बी.आय. जनरल इन्शुरन्स कंपनीचे व्यवस्थापक सागर हुंडेकरी यांच्याकडे सुपूर्द करणेत आला. त्याची कपात प्रत्येक कामगारांच्या पगारातून महिना १०३५ रुपये केला जाणार आहे.
यावेळी गोकुळचे माजी चेअरमन व विद्यमान जेष्ठ संचालक रणजितसिंह पाटील, माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरुण डोंगळे , जिल्हा दुग्ध विकास अधिकारी अरुण चौगले , शशिकांत पाटील (चुयेकर), कार्यकारी संचालक डी.व्ही. घाणेकर , जनसंपर्क अधिकारी संजय दिंडे, आस्थापना प्रमुख अशोक पुणेकर, डॉ. चोपडे, प्रशासन विभागाचे सहा. व्यवस्थापक रामकृष्ण पाटील आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संग्राम मगदूम यांनी केले तर डॉ. वाघ यांनी आभार मानले.
फोटो
गोकूळ दूध संघ कर्मचारी पॉलिसीचा चेक प्रदान करतांना चेअरमन रविंद्र आपटे जेष्ठ संचालक अरूण डोंगळे रणजितसिंह पाटील कार्यकारी संचालक डी व्ही घाणेकर आदी मान्यवर
सकारात्मक
ReplyDelete