Saturday, 12 September 2020

व्हायरस शटआऊट कार्डचा गोरखधंदा - कोरोनाच्या महामारीत लोकांची फसवणूक


कोल्हापूर प्रतिनिधी  - 

मरता क्या न करता ?  ही अक्षरशः खरी होताना दिसत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. लोक उपचाराअभावी मरत आहेत. यामुळे मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे पण याला धाब्यावर बसवून चक्क एक गळ्यात अडकवायचं कार्ड आता बर्‍याच लोकांच्या गळ्यात दिसू लागले आहे. व्हायरस शट आऊट कार्ड असं नाव असणारे आणि मेड इन जपान असं लिहिलेलं कार्ड घालून लोक मुर्खासारख फिरत आहेत. हे कार्ड गळ्यात घातलं तर एक मीटरच्या परिसरातील हवा शुद्ध होते व कोरोना विषाणूचा खात्मा होतो अशा भूलथापा मारुन होलसेल मध्ये केवळ पंधरा ते वीस रुपयांना मिळणारी चायनीज बोगस टाकाऊ वस्तू शंभर दीडशे रुपयांना लोकांच्या गळ्यात मारली जात आहे. यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता या कार्ड मध्ये क्लोरीन अॉक्साईड ची पावडर आढळून आली. क्लोरीन अॉक्साईड म्हणजे ब्लिचिंग पावडर जी पाणी शुद्धीकरणासाठी मोठ्या प्रमाणात वापरली जाते. जर ब्लिचिंग पावडर गळ्यात बांधून फिरल्यावर कोरोना संसर्ग टाळता येत असेल किंवा कोरोना होत नसेल तर आजच्या घटकेला संपूर्ण देशात आणि राज्यात हा महामारीचा प्रसंग ओढवला असता का ? 
आशियासह संपूर्ण जगात बंदी असलेले हे बोगस प्रॉडक्ट कोरोना महामारीच्या काळात कोल्हापूरात मात्र धडाक्यात विकले जात आहे. आणि लोकसुद्धा आता हे व्हायरस शट आऊट कार्ड घातलं आहे मला काही होणार नाही, आता मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगची काय गरज अशा अविर्भावात वावरु लागले आहेत. 

व्हायरस शट आऊट कार्ड हे 
आंतरराष्ट्रीय घोटाळ्याचा हा भाग असल्याशिवाय दुसरं काही नाही. जगातील अनेक देशांनी बंदी घातली असताना भारतीय बाजारपेठेत ही बनावट कार्ड विक्री करण्यावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध नाहीत हे विशेष.
तेव्हा आता लोकांनीच स्वतः याची माहिती आणि खात्री करून अशा बोगस वस्तू पासुन स्वतःला आणि समाजाला आर्थिक आणि आरोग्य दृष्ट्या वाचवणे अत्यंत गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment