कोल्हापूर प्रतिनिधी -
"इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज" चा पदग्रहण सोहळा दि.५ सप्टेंबर रोजी सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत समाजासाठी काम करणे आणि मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करून सर्वांनी एकत्रित काम करणे असा या संस्थेचा उद्देश आहे. दि ५ सप्टेंबर हा राष्ट्रीय शिक्षक दिन आहे आणि हे औचित्य साधून कलब तर्फे या दिवशी कोल्हापूर शहरातील स्वयम् विशेष मुलांची शाळा आणि ज्ञानप्रबोधिनी भवन संचलित अंध मुलांची शाळा येथील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. अशा विशेष मुलांना घडवताना इतर मुलांपेक्षा जास्त लक्षपूर्वक काम करावे लागते याची जाणीव ठेवून या शिक्षकांच्या प्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
या पदग्रहण समारंभ प्रसंगी क्लब च्या अध्यक्षा म्हणून सौ. रितू वायचळ आणि सचिव म्हणून सौ. गीतांजली ठोमके यांनी सूत्रे स्वीकारली. या कार्यक्रमाला ईनरव्हील डिस्ट्रिक्ट ३१७ च्या डिस्ट्रिक्ट आय. एस.ओ. सौ. उत्कर्षा पाटील प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. सूत्रसंचालन सौ अमृता पारेख यांनी केले
No comments:
Post a Comment