कंदलगाव - प्रकाश पाटील
कोरोना पॉझिटीव्ह हा शब्द ऐकला तरी अनेकांच्या मनाचा धीर सुटतो.घाबरलेले शेजारी आणि कुटूंबातील सदस्यांची पळापळी हे पाहून जीव निम्मा झालेला असतो. मात्र फुलेवाडी येथील जयभवानी कॉलनीमध्ये राहणारे बबन भोसले वय ८५ व त्यांच्या पत्नी रतन भोसले वय ८० यांनी धीर न सोडता धैर्याने कोरोनाचा सामना केल्याबद्दल कॉलनीमध्ये त्यांचे स्वागत करण्यात आले.
गेल्या महिन्यात किरकोळ त्रास जाणवत असल्याने त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला परंतू मनाची तयारी करून अगदी खंबीरपणे या दाम्पंत्याने योग्य आहार, व्यायाम व सोशल डिस्टन्स पाळून वीस दिवसात कोरोनावर मात केली.
या दाम्पंत्याच्या स्वागतासाठी विठ्ठल शिगे, शंकरराव मोरे, मोहन संकपाळ,रवळनाथ कुंभार, संजय पाटील, प्रकाश नंदिवाले, गणेश भोसले यांचे सह कॉलनीतील महिला उपस्थित होत्या.
कोरोना बद्दल मनात भिती होती मात्र ती भिती पत्नीसमोर व्यक्त न करता आपण खंबीर राहीलो. योग्य आहार, व्यायाम यामुळे कोरोनावर मात करू शकलो.
बबन भोसले
फोटो . फुलेवाडी जय भवानी कॉलनीमध्ये कोरोनावर मात केलेल्या भोसले दाम्पत्यांचे स्वागत करताना विठ्ठल शिंगे व इतर.
No comments:
Post a Comment