कंदलगाव . प्रकाश पाटील
माझं शिक्षण खूप झालयं मी शेतात काम कस करू या हट्टापाई अनेकांची प्रगती खुंटली असल्याचे आपण ऐकतो. मात्र याच उच्च शिक्षणाचा उपयोग आपल्या शेतीत करून पाणीची बचत करत भाजीपाल्यातून भरघोस उत्पादन हणबरवाडी ता. करवीर येथील दोन भावंडांनी घेतले आहे.
अजित खोत व विनय खोत हे तुलते -पुतने एकमेकांच्या मदतीने लॉक डाऊन काळात आपल्या उच्च शिक्षणाचा उपयोग शेतात प्रगती करण्यासाठी करीत आहे. अजित हे केमिकल इंजिनिअर असून त्यांचा पुतण्या विनय सध्या केमिस्ट्रीतून बीएससीच्या तीसऱ्या वर्गात आहे. लॉक डाऊन काळात अनेकांना आपल्या नोकऱ्या, व्यवसाय गमवावे लागल्याने अनेक तरूण बेरोजगार आहेत. आशावेळी आपल्या आहे त्या शेतीत शिक्षणाच्या उपयोगातून प्रगती साधून खोत बंधूंनी आपल्या मुरमाट जमिनीत पाण्याचा कमीत कमी वापर करून टिबकद्वारे वांगी, दोडका, भेंडी, कारली यासारख्या फळभाज्यांचे उत्पादन घेतले आहे. आपल्या गावात पाण्याची कमतरता असल्याचे जाणून ऊस पिका ऐवजी भाजीपाल्याला महत्व देऊन उत्पादन कसे वाढेल याकडे लक्ष दिले आहे.
अजित यांची सात एकर व विनय याची साडेतीन एकर शेती आहे. लॉक डाऊन काळात आलेल्या अनुभवातून आपली शेतीच बरी असे मनावर बिंबवून भाजीपाल्यातून उत्पादन घेऊन भरघोस फायदा मिळविला आहे.
दररोज भाजीपाला घेऊन कोल्हापूर येथील शिंगोशी मार्केटमध्ये विक्रीसाठी येतात. सकाळी आपले उत्पादन विक्री करून दिवसाच्या उर्वरीत वेळी शेतातील इतर कामे करण्यात मग्न असतात. नोकरी व व्यवसाया व्यतिरिक्त आपल्या शेतीतून उत्पादन घेऊन आपले कुटूंब सावरता येते. शेतीची मशागत, किरकोळ औषध फवारणी, देखभाल यातून गेल्या सहा महिन्यात लाखो रुपयाचे उत्पादन घेतले असल्याचे त्यांनी सांगीतले.
पाणी बचतीसाठी ....
परिसरात पाण्याची कमतरता असल्याने कमीत कमी पाण्याचा वापर करणेसाठी संपूर्ण शेतात टिबक सिंचन करून त्याद्वारे भाजीपाला उत्पादन सुरू आहे. यातून विजेची व पाण्याची बचत होऊन आवश्यक पाण्याच्या मात्रेमुळे पिक उत्पादन वाढले आहे.
शेतकऱ्यांनी फक्त ऊस शेतीवर अवलंबून न राहता इतर पिके, भाजीपाला, फळभाज्यांचे उत्पादन घेऊन पाणी व विजेची बचत करावी.ऊस पिकासाठी पाणी जास्त लागते व पिक वेळेत जात नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. भाजीपाल्यातून भरघोस उत्पादन घेऊन प्रगती साधता येते.
अजित खोत, विनय खोत
प्रगतशिल शेतकरी .
फोटो - हणबरवाडी येथे कमी पाण्यात भरघोस भाजीपाल्याचे उत्पादन घेणारे खोत बंधू .
( छायाचित्र . प्रकाश पाटील )
Good Job Bro..! I'm proud of you... Long way to go.
ReplyDelete