कोल्हापूर दिनांक 9
कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचा कामकाजाचा अहवाल पाहतात तसेच पतसंस्थेने सभासदांच्या हितासाठी राबविलेल्या विविध योजना पाहता ही एक महाराष्ट्रातील गुणवंत व आदर्श पतसंस्था असल्याचे उद्गार माननीय आमदार चंद्रकांत जाधव यांनी पतसंस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या सभासदांचा व त्यांच्या पाल्यांचा 'विद्याभवन' येथे झालेल्या गुणगौरव आणि सत्कार समारंभ प्रसंगी काढले .यावेळी अध्यक्षस्थानी सभापती संजय पाटील होते माननीय आमदार पुढे म्हणाले संस्थेने ठेवीदारांना योग्य दर देऊन कर्जाचा दरही अत्यंत कमी ठेवलेला आहे .त्याचबरोबर नवीन पेन्शन धारकांचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी केलेली योजना अत्यंत महत्त्वाची आहे . हे उत्तम काम संस्थेने केले आहे . अनेक सभासदांनी केलेल्या कार्याबद्दल व त्यांच्या पाल्यांनी विविध परीक्षेमध्ये यश संपादन केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले .तसेच महानगरपालिका शिक्षकांच्या वेतनावरील खर्च 100% शासन अनुदानातून मिळावा यासाठी पाठपुरावा करू व शिक्षकांच्या पाठीशी सदैव उभे राहण्याचे अभिवचन यानिमित्ताने दिले .
यावेळी पुणे शिक्षक विभागाचे नूतन आमदार माननीय प्राध्यापक जयंत आसगावकर यांचा सत्कार करण्यात आला त्यांनीही शिक्षक व विद्यार्थी यांचे कौतुक केले . तसेच सर्वांनी मिळून शिक्षण क्षेत्रामध्ये निकोप वातावरण ठेवण्यासाठी आणि शिक्षकांच्या प्रश्नांसाठी कायमपणे पाठीशी राहणार असल्याचे सांगितले . यावेळी जवळपास तीस वर्षाहून अधिक काळ पतसंस्थेचे संचालकतसेच सभापती म्हणून काम केलेले ऑल इंडिया फेडरेशन ऑफ एलिमेंट्री टीचर्स ऑर्गनायझेशनचे (आयफेटो) राष्ट्रीय अध्यक्ष प्रभाकर आरडे यांनी पतसंस्थेच्या प्रगतीचा व इतिहासाचा आढावा घेतला ,पतसंस्थे मध्ये राबविलेल्या विविध योजनांची माहिती दिली पतसंस्थेच्या उभारणीसाठी केलेल्या प्रयत्नांची जाणीव सभासदांना करून दिली . शिक्षक समितीचे नेते दिलीपराव भोईटे खजानीस उमेश देसाई यांचीही मनोगते झाली . यावेळी कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती व विविध संस्थांकडून आदर्श पुरस्कार मिळालेल्या सभासदांचा, शिष्यवृत्ती परीक्षेत मार्गदर्शक केलेल्या शिक्षकांचा ,पीएचडी पदवी प्राप्त करणारे अजित पाटील ,मनपाच्या शाळांना मदत करणारे द्वारकानाथ भोसले, त्याचबरोबर सभासदांच्या पाल्यांनी विविध परीक्षेमध्ये यश संपादन केले ,अशा सर्वांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुधाकर सावंत, सूत्रसंचालन सुवर्णा सोनाळकर - संदीप जाधव व आभार प्रदर्शन संजय कडगावे यांनी केले . यावेळी उपसभापती मनोहर शिंदे, वसंत आडके, प्रकाश पाटील ,आशालता कांजर, सरिता सुतार, सुभाष धादवड ,राजेंद्र गेंजगे,शकील भेंडवडे, विजय जाधव ,दिलीप माने, मनोज सोरप आदी संचालक व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
No comments:
Post a Comment