हातकणंगले प्रतिनिधी - मिलींद बारवडे
दि. 11 जानेवारी 2021
समाजातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी पत्रकारांनी पत्रकारितेचा वापर करावा त्यासाठी लोकोपयोगी पत्रकारिता करावी. प्रत्येक गोष्टी आणि व्यक्ती मध्ये बातमी असते, ती शोधायला पाहिजे त्यासाठी शोधवृत्ती असावी. बातमीमूल्य लक्षात घेऊन स्वतः शिकत शिकत पत्रकारांनी लोकशिक्षण ही करावे.असे आवाहन दैनिक लोकमत संपादक वसंतराव भोसले यांनी केले.
कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशनच्यावतीने हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथील संजय घोडावत विद्यापीठामध्ये आयोजित पत्रकार दिन व उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी बी न्यूज चे कार्यकारी संपादक ताज मुल्लाणी, दै. लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार समीर देशपांडे ,कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टस वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे, उपाध्यक्ष अभिजीत कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
संपादक वसंतराव भोसले पुढे म्हणाले, पत्रकारांनी पत्रकारितेवर अवलंबून न राहता उदरनिर्वाहासाठी पर्यायी सक्षम पर्याय शोधणे ही काळाची गरज बनली आहे. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले . उपस्थित सर्वांचे स्वागत प्रा. रवींद्र पाटील यांनी केले . त्यानंतर प्रास्ताविकामध्ये संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला .
बी न्यूज चे कार्यकारी संपादक ताज मुल्लाणी म्हणाले, पत्रकारांनी समाजातील वाईट प्रवृत्तीवर प्रहार करावा व चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन द्यावे. रंजल्या गांजल्याचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, समाज त्याची नक्कीच जाणीव ठेवतो.
संजय घोडावत पॉलीटेक्निकचे प्राचार्य विराट गिरी यांनी आपल्या भाषणात जिल्ह्यातील उपस्थित सर्व पत्रकारांचे स्वागत करून कोरोनामुळे अनेक नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत , त्या संधींचा फायदा घ्यावा व काळानुसार बदलाला सामोरे जावे असे आवाहन केले.
दैनिक लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार समीर देशपांडे म्हणाले , समाजाला पुढे नेण्यासाठी पत्रकारांचा सिंहाचा वाटा असतो .पत्रकारांच्या मध्ये मोठी ताकत असते, त्या ताकतीचा समाजाला विधायक दिशेने नेण्यासाठी वापर करावा. प्रा. रवींद्र पाटील संपादित 'जागल्या स्मरणिकेचे ' व त्यांच्या 'श्रमिकांचे विश्व ' या कवितासंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.
त्यानंतर पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यामध्ये दै. महासत्ताचे व्यवस्थापक चंद्रकांत मिठारी ,दै . पुढारी चे राजू पाटील ,एबीपी माझा चे विजय केसरकर, दैनिक पुण्यनगरीचे दगडू माने ,छायाचित्रकार निवास कांबळे ,दै.तरुण भारत संतोष सणगर, व लक्ष्मण व्हन्याळकर, दै. लोकमतचे सुहास जाधव, दै. महासत्ता चे विकास सुतार, दै. पुण्यनगरीचे निनाद मिरजे, दै. सकाळ चे गणेश बुरुड ,दै.पुण्यनगरी चे शैलेंद्र उळेगड्डी, दै. पुढारी चे रवींद्र पाटील ,दै.सकाळचे प्रकाश तिराळे, दै. पुढारी चे श्रीमंत लष्कर, दै. तरुण भारतचे सागर लोहार ,एस न्युज चे राम पाटील, दै. सकाळचे संजय पाटील ,दै.तरुण भारतचे सतीश पाटील ,दै.सकाळचे धनाजी पाटील, दै. पुढारी चे संजय साळुंखे यांचा समावेश होता. जिल्ह्यातील पत्रकारांचे संघटन उत्तमरित्या केल्याबद्दल संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे व उपाध्यक्ष अभिजीत कुलकर्णी यांचा सत्कार वसंत भोसले व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशनचे उपाध्यक्ष अभिजीत कुलकर्णी, सचिव सुरेश पाटील ,खजानिस सदानंद कुलकर्णी, कौन्सिल मेंबर अतुल मंडपे, प्रा. रवींद्र पाटील, प्रा. भास्कर चंदनशिवे, नंदकुमार कांबळे, प्रसिद्धीप्रमुख भाऊसाहेब सकट, ॲड. प्रशांत पाटील ,कौन्सिल मेंबर धनाजी गुरव , डॉ. निवास वरपे, सुरेश कांबरे, जिल्हा संघटक अवधुत आठवले, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र पाटील , विवेक स्वामी ,प्रशांत तोडकर , सलीम खतीब ,कोर कमिटी मेंबर ,सर्व तालुका अध्यक्ष ,पदाधिकारी व जिल्ह्यातील सर्व दैनिक आणि न्यूज चॅनेलचे पत्रकार व सत्कार मूर्तींचे कुटुंबीय उपस्थित होते.
कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशनचे पुरस्कार प्राप्त पत्रकारांच्या सोबत संपादक वसंत भोसले,कार्यकारी संपादक ताज मुल्लाणी, जेष्ठ पत्रकार समीर देशपांडे, प्राचार्य विराट गिरी ,अध्यक्ष सुधाकर निर्मळे, उपाध्यक्ष अभिजीत कुलकर्णी, सचिव सुरेश पाटील खजानिस सदानंद कुलकर्णी आदीसह पदाधिकारी.
No comments:
Post a Comment