Wednesday, 27 January 2021

मुख्याध्यापक संघाच्या विधायक उपक्रमांना सर्वतोपरी सहकार्यकरण्याची आमदार प्रा. आसगांवकर याची ग्वाही.


पेठवडगाव / प्रतिनिधी
मिलींद बारवडे

   विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाने राबविलेले उपक्रम गौरवास्पद असून संघाची उज्वल परंपरा जोपासण्याचे काम सुरु आहे. ही समाधानाची बाब आहे.संघाच्या विधायक उपक्रमांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे
आमदार प्रा. जयंत आसगांवकर यांनी दिली.यावेळी N.M.M.S. पुस्तकाचे प्रकाशन व हिंदी शब्दसंपदा व्याकरण और उपयोजित लेखन या
पुस्तकाचे प्रकाशन पुणे विभागाचे शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगांवकर व माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
  स्वागत व प्रास्ताविकात संघाचे चेअरमन  सुरेश संकपाळ म्हणाले, शाळांनी संघामार्फतप्रकाशित झालेली हिंदी व्याकरण पुस्तक, मराठी व्याकरण, N.M.M.S. पुस्तके व अन्य साहित्य जिल्ह्यातील सर्व शाळांनी संघाकडे जास्तीत जास्त खरेदी करावीत. संघ प्रकाशने अत्यंत दर्जेदार स्वरूपाची असून अल्प किमतीत उपलब्ध असल्याची माहिती  संकपाळ यांनी दिली.     
   कोरोनाकालावधीत शाळा बदं झाल्याने संघाचा व्यवहार ठप्प झाला त्यामुळे संघ आर्थिक आरिष्ठात सापडल्याने संघाच्या पदाधिकारी यांनी बिनव्याजी ठेव संघामध्ये ठेवल्याने संघाचा कारभार सध्या सुस्थितीत चालू आहे.
   संघाचे सचिव दत्ता पाटील म्हणाले, डिसेंबर २०१७ पासून संघाचा कारभार स्वीकारला.त्यावेळी संघाच्या तिजोरीत खडखडाट होता. त्याचा ताळमेळ घालत ३१ मार्च, २०२० पर्यंत ७० लाख रुपये शिल्लक ठेवले. परंतु जागतिक महामारीमुले संघातील सर्व आर्थिक गंगाजली संपुष्टात आली.कर्मचारी पगार व इतर कार्यक्रम घेणे अवघड झाले. संघाचे चेअरमन यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देवून एका दिवसात सात लाख पन्नास हजार रुपये जमा झालेत.संघाच्या परीक्षा योजनेत सुमारे ४ लाख विद्यार्थी ९ जिल्ह्यातून प्रविष्ठ होतात. आम्ही सत्तेत आल्यानंतर उर्दू व इंग्रजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका छपाईचे काम सुरु केले. यांनी संघाच्या अनेक उपक्रमांची माहिती दिली. तसेच विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी संघामार्फत गणित प्राविण्य, विज्ञान प्रज्ञा, सोशल टॅलेन्ट सर्च परीक्षा अशा प्रकारच्या परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षात सुमारे १० हजार विद्यार्थी प्रविष्ठ होतात.गेल्या दोन वर्षापासून N.M.M.S. स्पर्धा परीक्षेचे टीम एक उत्कृष्ट उपक्रम राबवित आहे.त्यामध्ये एक सराव शाळेत व दुसरा सराव केंद्रावरती खर्च करून घेण्यात येते. त्यामुळे जिल्ह्यातीलN.M.M.S. ची संख्या जिल्ह्यात नव्हे तर राज्यात प्रथम क्रमांकाची आहे. सध्या N.M.M.S. ची एक पुस्तिका प्रकाशित केलेली आहे. ती अल्प किंमतीत विक्रीसाठी उपल्ब असल्याची माहिती दिली. सदर पुस्तिकेत २० प्रश्नपत्रिकांचा समावेश असल्याची माहिती दिली. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून मागणी होत आहे.माध्यमिक शिक्षण विभाग, उपसंचालक कार्यालय, एस.एस.सी.बोर्ड व डायएट यांना संघाचे नेहमीच सहकार्य असते.विद्यमान आमदार हे एक संस्थाचालक व प्राध्यापक आहेत. कारण पहिल्याच कामकाजात त्यांनी दि. १० जुलै, २०२० ची अधिसूचना रद्द केली. विद्यमान आमदारांच्याकडून शिक्षकांच्या खूप
अपेक्षा आहेत. त्यांनी शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित समस्यांचा निपटारा करावी ही अपेक्षा सर्व वर्गातून होत आहे.
     महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या सदस्यांची मुदत संपून सहा महिने झालेलेआहेत. महामंडळावर काम करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा कौन्सिल सदस्यांची निवड करण्यातआली. त्यांचा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे. कौन्सिलपदी काम करण्याची संधी जिल्ह्यातील अनेक मुख्याध्यापकांना मिळाल्याने त्यांच्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
    हिंदी व्याकरण पुस्तकाचे संपादक बाळासाहेब विभूते, डॉ. रजनीकांत पोवार यांच्या त्यांच्यासंपूर्ण टीमचा व N.M.M.S. चे संपादक जितेंद्र म्हशाळे, डॉ सचिन कोंडेकर, पी. व्ही.आंबोळे,वाय. डी. धामणे, डी. आर. आदींचा सत्कार करण्यात आला.स्वागत व प्रास्ताविक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ यांनी केले. आभार व्हा. चेअरमन मिलिंद पागिरेकर तर सूत्रसंचालन रविंद्र मोरे यांनी केले.
     यावेळी दादासाहेब लाड, बाबासाहेब पाटील , भरत रसाळे, डी सी पाटील,व्हा. चेअरमन बी. आर. बुगडे , सहसचिव अजित रणदिवे, ट्रेझरर नंदकुमार गाडेकर,लोकल ऑडिटर इरफान अन्सारी, संपर्क प्रमुख अशोक हुबळे, संचालिका अनिता नवाळे, सारिका यादव, संचालक संजय देवेकर, बबन इंदूलकर, श्रीशैल्य मठपती, प्रकाश पोवार, पी. व्ही.पाटील, सुरेश लक्ष्मण उगारे, गुलाब पाटील, एस.एस. चव्हाण, एस. आर. पाटील, एस. एम.मोरस्कर, सागर कुमार घुडाप्पा, सेवानिवृत्त सदस्य एम. के. आळवकर, स्वीकृत सदस्य, बी. सी.वस्त्रद, ए. ए. पाटील, महामंडळाचे पदाधिकारी आर.डी. कुंभार व एम. आर. पाटील आदी उपस्थित होते.
        फोटो 
मुख्याध्यापक संघाच्यावतीने बी. सी. वस्त्रद यांचा सत्कार आम. प्रा. जयंत आसगावकर माध्यमिक शिक्षण अधिकारी किरण लोहार करतांना शेजारी दादासाहेब लाड सचिव दत्ता पाटील व इतर मान्यवर.

No comments:

Post a Comment