हातकणंगले / प्रतिनिधी
दि.27/121
हेरले (ता.हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीचे ध्वजारोहन सरपंच अश्विनी चौगुले यांच्या हस्ते संपन्न झाले.याप्रसंगी उपसरपंच राहुल शेटे मंडलाधिकारी भारत जाधव, तलाठी संदीप बरगाले, ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण ,पशुवैद्यकीय अधिकारी आशिष पाटीलसह सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
मौजे वडगाव येथे ७२ व्या प्रजासत्ताक दिनाचे ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण ग्रामपंचायत सदस्या अश्विनी लोंढे यांच्या हस्ते संपन्न झाले. झेंडा चौक येथील ध्वजारोहण अविनाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. बौद्ध समाज मंदिराचे ध्वजारोहण सरताज बारगीर यांच्या हस्ते संपन्न झाले. दत्त सोसायटीचे ध्वजारोहण रोहन चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. प्राथमिक विद्या मंदिराचे ध्वजारोहण संतोष शेंडगे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सरपंच काशिनाथ कांबळे, उपसरपंच सुभाष अकिवाटे ,ग्राम विकास अधिकारी व्ही .व्ही. कांबळे, ग्रामपंचायत सदस्य अवधूत मुसळे, श्रीकांत सावंत, माजी सरपंच रावसाहेब चौगुले, माजी उपसरपंच सुरेश कांबरे, डॉ.विजय गोरड, माजी चेअरमन अॅड.विजय चौगुले, माजी सरपंच सतीश चौगुले,स्वप्नील चौगुले , सुनिल खारेपाटणे ,विजय मगदूम ,महेश कांबरे,अमोल झांबरे आदी मान्यवरांसह ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
मौजे माले गावच्या ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण सरपंच प्रताप ऊर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी उपसरपंच रोहिणी भरत गावडे व ग्रामपंचायत सदस्यसह ग्रामस्थ उपस्थित होते.
मौजे मुडशिंगी गावच्या ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण सरपंच मीनाक्षी प्रकाश खरशिंगे यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी उपसरपंच गजानन जाधवसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
मौजे चौकाक गावच्या ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण उपसरपंच सुवर्णा प्रकाश सुतार यांच्या हस्ते संपन्न झाले तर ध्वज पूजन लता कृष्णात पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी सरपंच मनीषा सचिन पाटील, सचिन पाटील आदीसह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment