पेठवडगाव / प्रतिनिधी
दि.15/1/21
स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाऊंडेशन, महाराष्ट्र (सर फाउंडेशन)च्या हातकणंगले तालुका समन्वयकपदी आदर्श विद्यानिकेतन अँड ज्युनियर कॉलेज , मिणचे ( ता. हातकणंगले ) येथील डॉ . दिपक शेटे यांची निवड करण्यात आली.
सोलापूर येथे मुख्य कार्यालय असलेले सर फाऊंडेशन हे देशातील शिक्षकांसाठी उपक्रमशील, तंत्रस्नेही व वेगवेगळे प्रयोग राबवविणाऱ्या शिक्षकांचे देशपातळीवरील हक्काचे व्यासपीठ म्हणून ओळखले जाते.डॉ.दिपक शेटे यांना लेखक , संग्राहक , नाटककार , तंत्रस्नेही शिक्षक ,गणित व्याख्याते तज्ञ मार्गदर्शक व उत्कृष्ट शिक्षक अशी त्यांची ओळख राज्यभर आहे .त्यांच्या या कार्याची दखल घेऊन सर फाउंडेशन त्यांची ही निवड केली आहे . श्रीमती रंजीता काळबेरे, वर्षा निशाणदार यांनी त्यांची निवड केली त्यांचे शैक्षणिक क्षेत्रात कौतुक होत आहे .
No comments:
Post a Comment