पेठवडगांव/ प्रतिनिधी
मिलींद बारवडे
दि.14/1/21
कोल्हापूर जिल्ह्यातील शाळांना इ. ५ वी ते इ. ८ वी चे वर्ग सुरु करण्याबाबत स्पष्ट आदेश व्हावेत अशी मागणीचे निवेदन कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्यावतीने शिक्षणाधिकारी (माध्य.)
किरण लोहार यांना देण्यात आले.
याबाबतचा निर्णय लवकरच सर्वांना कळविला जाईल असे आश्वासन शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी शिष्टमंडळास दिले. शासनाच्या निर्देशानुसार सर्वच शाळांनी दि. २३ नोव्हेंबर, २०२० पासून इ. ९ वी ते इ. १२ वीचे वर्ग सुरु केले आहेत. जिल्ह्यांतील बहुतांशी शाळांनी स्थानिक परिस्थितीनुसार इ. ५ वी ते इ.८ वी
चे वर्ग केले आहेत. परंतु यामध्ये एकवाक्यता नाही. सदरचे वर्ग सुरु करण्याबाबत स्पष्ट आदेश नसल्याने विद्यार्थ्याना एस.टी. पासही दिले जात नाहीत. त्यामुळे इ. ५ वी ते इ. ८ वी चे वर्ग सुरु करण्याबाबत शाळांना स्पष्ट आदेश व्हावेत त्याबाबत मार्गदर्शन मिळावे अशी मागणी जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या शिष्टमंडळाने केली.
यावेळी शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव लक्ष्मीकांत सावंत, उपशिक्षणाधिकारी डी. एस.पोवार, महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबा पाटील, कायम विना अनुदान शाळा कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ, व्हा. चेअरमन
मिलिंद पांगिरेकर, सचिव दत्ता पाटील, मुख्याध्यापक महामंडळाचे सदस्य शिवाजी यल्लाप्पा कोरवी,एम. आर. पाटील, सहसचिव अजित रणदिवे, लोकल ऑडिटर इरफान अन्सारी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो
माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना इ.५ वी ते इ.८ वी चे वर्ग सुरु करण्याबाबत स्पष्ट आदेश व्हावेत अशा आशयाचे लेखी निवदन देतांना मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळसह शिष्टमंडळ.
No comments:
Post a Comment