हातकणंगले / प्रतिनिधी
हातकणंगले तालुक्यातील तासगाव ग्रामपंचायतच्या सरपंचपदी चंद्रकांत आण्णा गुरव यांची तर उपसरपंचपदी सौ.पौर्णिमा आदिनाथ कांबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
तासगाव ग्रामपंचायतीची सन 2021-2026 साठीची निवडणूक बिनविरोध झाली असून सरपंच निवडी साठी झालेल्या विशेष सभेत सरपंच पदासाठी आरक्षित नागरिकांचा मागास प्रवर्ग(पुरुष)या प्रवर्गातून बिनविरोध निवडून आलेले चंद्रकांत गुरव यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.
दरम्यान याच वेळी उपसरपंच पदासाठी अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून निवडल्या गेलेल्या सौ पौर्णिमा आदिनाथ कांबळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची ही उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी रवींद्र ठोकळ यांनी काम पाहिले निवडी नंतर नूतन सरपंच, उपसरपंच यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी माजी सरपंच शिवाजीराव पाटील,संपतराव पाटील,जनार्दन पाटील, रघुनाथ सुतार ,एन डी पाटील,अर्जुन कोकाटे, अर्जुन पाटील,तानाजी पाटील,सागर पाटील,ग्रामसेविका एस एस दगडे तलाठी जाधव,यांचे सह सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
फोटो:-
No comments:
Post a Comment