Thursday, 11 February 2021

देशाचे ग्रामिण अर्थकारण व समाजजीवन बदलण्याची ताकत प्राथमिक दूध संस्थेमध्ये - डी.व्ही.घाणेकर

हातकणंगले/ प्रतिनिधी
दि.11/2/21
देशाचे ग्रामिण अर्थकारण व समाजजीवन बदलण्याची ताकत प्राथमिक दूध संस्थेमध्ये आहे. त्यामुळे हा व्यवसाय मोठा करण्यासाठी सर्वच घटकांनी दूध उत्पादक शेतक-यांना सहकार्य केले पाहिजे. असे मत कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळचे कार्यकारी संचालक डी.व्ही.घाणेकर यांनी व्यक्त केले.
      ते मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथील कामधेनू सहकारी दूध संस्थेच्या २५०० लिटर दूध संकलन कलश पुजन व विमा धनादेश वाटप प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेच्या चेअरमन सौ. उमा चौगुले या होत्या. तर सहाय्यक निबंधक डॉ. गजेंद्र देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
     ते पुढे म्हणाले, दूधाचे कामकाज हे शास्ञोक्त पद्धतीने करणारा गोकुळ दूध संघ आहे. संस्था मोठी होण्यामागे सर्वांचा खारीचा वाटा असतो त्यांचा इतिहास विसरता कामा नये. संघाला होणारा नफा हा दूध उत्पादकांना वाटप केला आहे. पण खाजगी दूध गोळा करणारे वाटप करीत नाहीत. भविष्यात दूधाला प्रचंड मागणी येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिक जोमाने दूध व्यवसाय वाढवावा असे आवाहन घाणेकर यांनी केले.
     याप्रसंगी सहाय्यक निबंधक (पदुम) डॉ. गजेंद्र देशमुख म्हणाले कामधेनू दूध संस्थेचे कार्य म्हणजे सहकारातील उत्कृष्ट कार्याचा नमुना म्हणता येईल.संघाचे व्यवस्थापक शरद तुरंबेकर, विमा प्रतिनिधी के.वाय.पाटील, बॅंक व्यवस्थापक दिपक शुक्रे, श्रीकांत सावंत, राजू थोरवत आदींची भाषणे झाली.  
   या कार्यक्रमास गोकुळचे संकलन उप व्यवस्थापक डी.डी.पाटील, सरपंच काशिनाथ कांबळे, संस्थेच्या चेअरमन सौ.‌उमा चौगुले, व्हा. चेअरमन महंमद हजारी, महेश कांबरे, मानसिंग रजपूत, डॉ. विजय गोरड, सुभाष आकिवाटे, अमिर हजारी, संजय चौगुले, बशीर हजारी, सुरेश पाटील, उदय आंबी,सादीक जमादार यांच्यासह दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विविध क्षेञात विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
स्वागत माजी उपसरपंच किरण चौगले यांनी केले, प्रास्ताविक सचिव रमेश लोंढे यांनी केले. आभार विजय मगदूम यांनी मानले.

          फोटो 
मौजे वडगाव - कामधेनू सहकारी दूध संस्थेच्या कार्यक्रमात बोलतांना गोकुळचे कार्यकारी संचालक डी.व्ही.घाणेकर, सहाय्यक निबंधक डॉ.गजेंद्र देशमुख व शेजारी इतर मान्यवर.

No comments:

Post a Comment