Thursday, 11 February 2021

कोजिमाशी पतसंस्थेच्या वतीने कोवीड संसर्ग झालेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर सभासदांना मदत निधी धनादेश वाटप

पेठवडगांव / प्रतिनिधी
दि.11/2/21
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक सहकारी पतसंस्थेच्या वतीने कोवीड संसर्ग झालेल्या  शिक्षक व शिक्षकेत्तर सभासदांना मदत निधी धनादेश वाटप करण्यात आला.
वडगांव विद्यालय ज्युनिअर कॉलेजमध्ये कोजिमाशि पतसंस्थेच्या वतीने धनादेश वाटप कार्यक्रम आयोजित केला होता.
        कोजीमाशि पतसंस्थेचे तज्ञ संचालक दादासाहेब लाड म्हणाले मागील काही महिन्यामध्ये कोरोना संसर्गामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील संस्थेचे ३४ सभासद शिक्षक मयत झाले.या शिक्षकांचे कर्ज माफ  करून त्यांच्या कुटुंबांना आर्थिक दिलासा संस्थेच्या वतीने देण्यात आला आहे. या मयत सभासद शिक्षकांना १ कोटी ५५ लाख रुपये इतकी रक्कम कर्जमुक्ती योजनेतून कर्ज माफ करण्यात आले आहे. तसेच ज्या शिक्षक व शिक्षेकेत्तर सभासदांना कोविड संसर्ग झाला होता त्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये  असा मदत निधी वाटप करण्याचा निर्णय संचालक मंडळात घेण्यात आला. जिल्ह्यामध्ये जवळपास ३०० शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना प्रत्येकी पाच हजार रुपये प्रमाणे संस्थेकडून मदत निधी देण्यात येत आहेत.
       संस्थेच्या कोरोना संसर्ग सभासदांना पाच हजार रुपयांच्या मदतनीधी वाटपाची रक्कम सुमारे पंधरा लाख इतकी होत आहे. या सभासदांना  एक आर्थिक छोटीशी भेट म्हणून हा उपक्रम राबवला जात आहे.संस्थेने सभासदांच्या हिताचे विविध उपक्रम राबविल्याने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संस्थेचे नाव लौकिक झाले आहे.महापुराच्या काळामध्ये ही कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षण संस्थेंच्या शाळांना पंधरा लाख रुपयाचा निधी देण्यात आला आहे. तसेच संस्थेकडून कोरोना संसर्ग काळामध्ये शासन निधीस मदत म्हणून शासनास  २ लाख ५१ हजार रुपयाचा निधी देण्यात आला आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये संस्था सभासदांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.
         पतसंस्थेच्या जिल्ह्यातील कोल्हापूर,पेठवडगांव,इचलकरंजी,सरवडे, गारगोटी,मुरगूड, शिरोळ, कोतोली, कोपार्डे, कोवाड, शाहूनगर परिते, गडहिंग्लज आदी शाखांमधून कोरोना संसर्ग सभासदांना  मदत निधीचा धनादेश वाटप करण्यात येत आहे.
      या प्रसंगी चेअरमन बाळासाहेब डेळेकर, व्हा.चेअरमन सुभाष पाटील, माजी चेअरमन कैलास सुतार, सीईओ अरविंद पाटील, विजय पाटील ,नितीन शिंदे, प्राचार्य आर आर पाटील उपमुख्याध्यापक संभाजी माने, पर्यवेक्षक दिनकर पाटील, उपप्राचार्य मनोहर परीट, मुख्याध्यापक नांगरे ,मिलींद बारवडे सुधाकर निर्मळे , अशोक माळी , संताजी भोसले ,स्वप्ना थोरात, उमा पाटील आदी मान्यवरांसह शिक्षक व शिक्षकेत्तर सभासद उपस्थित होते. सूत्रसंचालन अकबर पन्हाळकर यांनी केले.
        फोटो 
मदत निधीचा धनादेश प्रदान करताना मुख्याध्यापक आर आर पाटील शेजारी चेअरमन बाळासाहेब डेळेकर तज्ञ संचालक शिक्षक नेते दादासाहेब लाड व्हा.चेअरमन सुभाष पाटील, सीईओ अरविंद पाटील आदीसह इतर मान्यवर

No comments:

Post a Comment