कोल्हापूर / प्रतिनिधी
दि.15/2/21
कोनवडे (ता. भुदरगड ) येथील प्रा . एच . आर. पाटील यांची कोल्हापूर जिल्हा राज्यशास्त्र महाविद्यालयीन परिषदेच्या कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे .ते दूधसाखर विद्यानिकेतन व ज्युनिअर कॉलेज बिद्री येथे
कार्यरत आहेत . त्यांनी २५ वर्षे अध्यापनाचे काम केले आहे . त्यांचा सखोल अभ्यास, प्रदीर्घ अनुभव विचारात घेऊन निवड करण्यात आली आहे . या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे .
यावेळी प्रा.संपतराव मोरे यांची अध्यक्ष म्हणून तर प्रा.धनाजीराव देसाई यांची महासचिव म्हणून निवड करण्यात आली. प्रा. हिंदूराव पाटील यांना
दूधसाखर शिक्षण संकुलाचे अध्यक्ष माजी आमदार के.पी .पाटील,संस्थेचे उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, कार्यकारी संचालक आर . डी देसाई, सेक्रेटरी कुलकर्णी, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य आर .व्ही . पाटील, उपप्राचार्य एस .एस . पाटील, उपमुख्याध्यापक प्रा . एस . बी जाधव, पर्यवेक्षक एन .पी .फराकटे, व्होकेशनल विभागप्रमुख प्रा.एन. डी. पाटील यांचे सहकार्य लाभले .
No comments:
Post a Comment