हातकणंगले / प्रतिनिधी
दि.15/2/21
शिक्षकांनी आपल्या विध्यार्थ्यांना सर्वोत्तम ज्ञान देण्यासाठी सदैव नवनवीन ज्ञान घेत राहिले पाहिजे असे प्रतिपादन माजी खासदार निवेदिता माने यांनी आनंदगंगा फौंडेशन च्या वतीने आयोजित पुस्तक प्रकाशन व आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना केले. त्या अतिग्रे ( ता. हातकणंगले) येथील संजय घोडावत विद्यापीठाच्या सभागृहामध्ये आनंद गंगा फौंडेशनच्या कार्यक्रम प्रसंगी बोलत होत्या.
या वेळी जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समिती सभापती प्रवीण यादव यांनी फौंडेशनचे अध्यक्ष तानाजीराव पोवार यांनी राबविलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे मत व्यक्त केले . कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी हातकणंगले पंचायत समितीचे सभापती डॉ. प्रदीप पाटील यांनी तानाजी पोवार यांनी पुस्तक प्रकाशित करून वाचन चळवळ वाढविण्यासाठी केलेला प्रयत्न स्तुत्य असल्याचे मत व्यक्त करून सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांना शुभेच्छा देत तालुका, जिल्ह्याचा शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख उंचावण्यासाठी अधिक जोमाने कार्यरत राहण्याचे आवाहन केले.
प्रास्ताविकात फौंडेशनचे अध्यक्ष व जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे निमंत्रित सदस्य तानाजी पोवार यांनी फौंडेशनच्या कार्याची माहिती सांगताना भविष्यात विविध समाजपयोगी उपक्रम राबविण्याचा मानस असल्याचे सांगितले.
यावेळी शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष अनिल चव्हाण,महेश पोळ शिक्षक नेते गौतम वर्धन,पुष्पवती दरेकर यांनी मनोगते व्यक्त केले.
या वेळी ३० शिक्षकांना 'आदर्श शिक्षक ' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर विविध स्पर्धा परीक्षा व माहिती साठी उपयुक्त अशा जनरल नॉलेज पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमास संजय घोडावत शिक्षण संकुलाचे विश्वस्त विनायक भोसले,प्राचार्य विराटगिरी ,गटशिक्षणाधिकारी प्रवीण फाटक,शिक्षक बँकेचे चेअरमन प्रशांत पोतदार,शिक्षक नेते एन. वाय. पाटील,अर्जुन पाटील,अनिल चव्हाण, सरपंच रंजना जाधव,अरविंद खोत,शिक्षक बँक संचालक दिलीप पाटील,साहेब शेख,जी.एस. पाटीलसह मान्यवर उपस्थित होते.सूत्रसंचालन अर्चना नरबळ यांनी केले तर आभार कृष्णात पाटील यांनी मानले.
फोटो
अतिग्रे: निमंत्रित सदस्य जि. प. शिक्षण समिती तानाजी पोवार यांच्या जनरल नॉलेज या पुस्तकाचे प्रकाशन करताना शिक्षण अर्थ समिती सभापती प्रविण यादव ,सभापती डॉ.प्रदीप पाटील, विश्वस्त विनायक भोसले, प्राचार्य विराट गिरी व अन्य मान्यवर.
No comments:
Post a Comment