Saturday, 6 February 2021

राजर्षी शाहू विद्यामंदिर ला उपायुक्त रविकांत आडसुळ यांची भेट

कोल्हापूर प्रतिनिधी 

कोल्हापूर महानगरपालिका शिक्षण समिती संचलित मनपा राजर्षी शाहू विद्या मंदिर शाळा क्रमांक 11 कसबा बावडा मध्ये कोल्हापूर उपआयुक्त रविकांत आडसूळ यांनी अचानक भेट दिली असता शालेय व्यवस्थापन व प्रशासन व्यवस्थित असल्याचे दिसून आले शासनाच्या नियमानुसार प्राथमिक शाळा सुरू आहेत त्यांनी कसबा बावडा येथील राजर्षी शाहू शाळेला भेट दिली व पाचवी ते सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची अभ्यासाबद्दल सुसंवाद साधला असता त्यांना विद्यार्थ्यांची प्रगती, शालेय शिस्त, सोशल डिस्टन्स चे नियम काटेकोरपणे वापरलेले आढळून आले.शाळेचे केंद्रमुख्याध्यापक  अजितकुमार पाटील यांनी शाळा सुरू असलेबद्दल सोशल डिस्टेंनसनुसार वर्गाचे तासीकांचे नियोजन,वेळापत्रक,ऑनलाईन विद्यार्थी, ऑफलाईन विद्यार्थी, परिपाठ नियम शाळा व्यवस्थापन समितीच्या सल्ल्यानुसार कसे केले आहे त्याची माहिती उपायुक्त साहेबांना दिली. इयत्ता पाचवीच्या वर्गाचे निरीक्षण केले व पाचवी स्कॉलरशिप संदर्भात विद्यार्थ्यांच्या मराठी, गणित या विषयावर एकदम सोप्या भाषेमध्ये सुसंवाद साधला असता समाधान वाटले.उपायुक्त रविकांत आडसूळ यांनी विद्यार्थ्यांचे मराठी शुद्धलेखन, इंग्रजी शुद्धलेखन व विद्यार्थ्यांची तयारी त्यांना चांगली वाटली त्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व कौतुक केले शाळेचे मुख्याध्यापक अजितकुमार पाटील यांनी प्रशासनाधिकरी एस के यादवसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व  शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी त्यांनी मार्गदर्शन असल्यामुळेच शैक्षणिक प्रवाहामध्ये अपडेट आहोत असे मनोगत व्यक्त केले. उपायुक्त साहेबांनी शाळाबद्दल स्वच्छता,शिक्षक आयडेंटि,मास्क, टापटीपपणा, वर्ग नियंत्रण, याबद्दल मुख्याध्यापक व शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी यांचे अभिनंदन केले.मराठी शुद्धलेखन बद्दल निखिल सुतार,केदार चौगले, कल्पना मैलारी,जान्हवी ताटे या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
 शाळेचे सेवक हेमंतकुमार पाटोळे, ज्येष्ठ शिक्षक उत्तम कुंभार, सुशील जाधव, आसमा तांबोळी, तमेजा मुजावर, सुजाता आवटी, शिवशंभू गाटे, विद्या पाटील, इत्यादी शिक्षक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment