हेर्ले / वार्ताहर
दि.11/3/21
मौजे वडगाव (ता.हातकणंगले ) येथील जय हनुमान दूध संस्थेमध्ये गोकुळ दूध संघ व राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने शिवसदन कंपनीचे चार बायोगॅस प्लॅन्टचे उद्घाटन गोकुळच्या महिला नेतृत्व विकास कार्यक्रमाच्या प्रमुख नीता कामत व सहाय्यीका वंदना पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी नीता कामत म्हणाल्या, सध्या देशामध्ये गॅस टाकीचे दर वाढत चालले आहेत. आपण ग्रामीण भागांमध्ये दुग्ध व्यवसाय करत आहोत, म्हैस व गाय पालनातून मिळणाऱ्या शेनापासून आधुनिक पद्धतीने निर्मित केलेल्या शिवसदन कंपनी सांगली यांच्या बायोगॅस प्रकल्प अतिशय चांगला आहे. त्याचा ग्रामीण भागातील दूध उत्पादकांनी लाभ घ्यावा. तसेच या बायोगॅसला साधारणपणे २५ टक्के सबसिडीही दिली जाते. तेव्हा चालू आर्थिक वर्षामध्ये गोकूळच्या माध्यमातून १५० बायोगॅस जिल्ह्यामध्ये होत आहेत. याचा आनंद होत आहे.
उद्घाटन प्रसंगी संस्थेने महिला दिनाचे आयोजनही केले होते. नीता कामत यांचा सत्कार संस्थेच्या संचालिका सुषमा कांबरे व वंदना पाटील यांचा सत्कार माजी सरपंच इंदूताई नलवडे यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे चेअरमन सतीश चौगुले संस्थापक चेअरमन बाळासो थोरवत सुरेश कांबरे, बाळासो चौगुले, आनंदा पवार, सचिव आण्णासो पाटील उपस्थित होते.
फोटो
मौजे वडगाव येथे बायोगॅसचे उदघाटन करताना निता कामत वंदना पाटील आनंदा पोवार, सुरेश कांबरे सचिव आण्णासो पाटील, चेअरमन सतिशकुमार चौगुले,बाळासो चौगुले आदी मान्यवर.
No comments:
Post a Comment