कोल्हापूर/ प्रतिनिधी
दि.13/4/21
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्ताचे औचित्य साधत विद्या मंदिर कणेरीवाडी शाळेत इयत्ता पहिलीच्या वर्गात १०२ विद्यार्थ्यांनी सोशल डिस्टंसिंग नियमाचे करून मास्क सॅनिटायझर वापर करत प्रवेश घेतला.
विद्या मंदिर कणेरीवाडी ही शाळा
राज्यात सर्वत्र डिजिटल शाळा म्हणून नावारूपास आली आहे.या शाळेमध्ये असलेली ई लर्निंग सुविधा, प्रशस्त वर्गखोल्या , क्रीडांगण , डिजिटल क्लासरूम, समृद्ध ग्रंथालय , प्रशस्त संगणक कक्ष , सुसज्ज प्रयोगशाळा , अनुभवी व तज्ञ शिक्षक वृंद, इयत्ता पाचवी आठवी शिष्यवृत्तीमध्ये विद्यार्थ्यांच्या यशाची उज्वल परंपरा, चौथी सातवी प्रज्ञाशोध तसेच विविध स्पर्धा परीक्षांचे उत्तम मार्गदर्शन, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे विविध गुणदर्शन स्नेहसंमेलन कार्यक्रम, कृतियुक्त अध्यापन, शाळा विकासात ग्रामपंचायत विविध सहकारी संस्था पालक व ग्रामस्थ यांचा सक्रिय सहभाग ,तसेच अभ्यासू क्रियाशील शाळा व्यवस्थापन समिती या सर्वांमुळे ही शाळा दिवसेंदिवस गुणवत्ता विकासाचे विविध उपक्रम राबवून "अ" मानांकन प्राप्त झाली आहे. जानेवारी 2020 मध्ये शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी या शाळेस भेट देऊन शाळेतील विविध उपक्रमांचे कौतुक केले होते . विद्या मंदिर कणेरीवाडी मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाची शाळा आजूबाजूच्या खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांना ही मागे टाकत एक हजार विद्यार्थी पटसंख्या कडे वाटचाल करत आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नूतन विद्यार्थ्यांना प्रवेश देणे प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कुमार मोरे, उपाध्यक्ष रवींद्र खोत सदस्य सरदार मोरे, रामचंद्र कदम, मुख्याध्यापक राहुल ढाकणे, प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या संचालिका लक्ष्मी पाटील, छाया पाणारी, विष्णू खोत ,दौलतबी कोल्हापुरे, प्रतिभा पाटील ,जयश्री पाटील ,दिपाली जरग ,मनोहर बावडेकर ,राजू दाभाडे डी बी आरडेकर , शैलजा गरडकर ,अर्चना गुरव ,विद्या जाधव, शुभांगी सुतार ,स्वप्नाली कतगर, सह सर्व शिक्षक उपस्थित होते.
फोटो
विद्या मंदिर कणेरीवाडी शाळेत नविन प्रवेशाची नोंद करतांना अध्यापिका लक्ष्मी पाटील व शिक्षकवृंद
No comments:
Post a Comment