कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती संचलित राजर्षी शाहू विद्या मंदिर मध्ये इयत्ता पहिली सेमी इंग्रजीच्या वर्गामध्ये तीस विद्यार्थ्यांचे प्रवेश संपन्न झाले.
कसबा बावड्यातील सामाजिक कार्यकर्ते संजय लाड यांच्या हस्ते व लक्ष्मण लाखे, रवींद्र लाखे, प्रकाश चौगुले, सतीश पाटील,सुनिल जाधव, बाबुराव सुतार, नारायण घेवदे, यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना मास्क, राजा पाटी इत्यादी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
संजय लाड यांनी पालकांनी आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी ऑनलाइन शिक्षणाचा वापर करावा व शाळेतील शिक्षक मित्रांच्या सहकार्याने शैक्षणिक सुविधा चा वापर करून 100 टक्के विद्यार्थ्यांना न्याय द्यावा असे प्रतिपादन केले
कार्यक्रमासाठी भारतवीर मित्र मंडळाचे पदाधिकारी, कसबा बावडा रिक्षा मित्र मंडळ यांनी मास्क दिले.
शाळेचे केंद्र मुख्याध्यापक डॉक्टर अजितकुमार पाटील यांनी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा व त्यांचा वापर करून आपल्या मुलांना शिक्षण द्यावे असे आवाहन केले. विद्यार्थी व पालकांचे स्वागत बालवाडीच्या मुख्याध्यापिका कल्पना पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुशील जाधव, शिवशंभु गाटे, उत्तम कुंभार, हेमंत कुमार पाटोळे ,सुजाता आवटी, आसमा तांबोळी, तमेजा मुजावर,अनिल जाधव,संजय फराकटे, अजित पाटील,तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते. आभार सुजाता आवटी यांनी मांडले.
No comments:
Post a Comment