Friday, 16 April 2021

सभापती डॉ.पद्माराणी राजेश पाटील यांचे कार्य कौतुकास्पद


हेरले / प्रतिनिधी
दि.17/4/21
                                                    

          रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघात महिला व बालकल्याण समितीच्या सभापती डॉ. पद्माराणी पाटील यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी देऊन मतदारसंघाचा कायापालट केला आहे. त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. असे मत माजी सभापती अविनाश बनगे यांनी व्यक्त केले. ते चोकाक (ता.हातकणंगले) येथील विविध विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. 
    चोकाक येथे महिला व बालकल्याण समिती सभापती डॉ. पद्माराणी पाटील यांनी विविध विकास कामासाठी पन्नास लाखाच्या दरम्यान फंड मंजूर केल्याने त्या विकास कामाचा शुभारंभ करून कामाची सुरूवात झाली. विकास फंडातून ८ लाख २० हजार निधी नवीन अंगणवाडी इमारतीसाठी , ६ लाख निधी आरोग्य उपकेंद्रे दुरुस्ती, ५ लाख निधी विद्या मंदिर दुरुस्ती, ६ लाख निधी शाहू सभागृह ते महावीर पाटील यांच्या घरापर्यंत डांबरीकरण, १५ लाख निधी मातंग समाज ते मकानदार शेत डांबरीकरण,  ५ लाख निधी जनरल स्मशानभूमी दुरुस्ती, गावात हायमास्ट दिवे बसवणे, जैन मंदिर संरक्षण भिंत या सर्व विकास कामाचे उद्घाटन सभापती डॉ. पद्याराणी पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
     यावेळी माजी सभापती  अविनाश बनगे यांनी आपल्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ हॉल  बांधकामासाठी ५१ हजार रुपयांची देणगी जाहीर केली.
      यावेळी डॉ.पद्माराणी पाटील, सरपंच मनीषा पाटील, उपसरपंच सुवर्णा सुतार, ग्रामपंचायत सदस्य महावीर पाटील, कृष्णात पाटील, सुकुमार पाटील, मनीषा कुंभार, बाळासाहेब देशिंगे, सचिन पाटील ,बाबासाहेब वन्हाळे, बापूसाहेब आवटे, नयन जाधव, विनायक कांबळे सुरज सुतार, सचिन आलमाने, दीपक जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
    फोटो 
चोकाक : येथे विविध विकास कामाचे उद्घाटन करतांना सभापती डॉ. पद्माराणी पाटील सरपंच मनीषा पाटील उपसरपंच सुवर्णा सुतार व इतर मान्यवर .

No comments:

Post a Comment