Monday, 19 April 2021

वर्ल्ड मराठा ऑर्गनाझेशन WMO च्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबीर संपन्न - रक्तदात्यांचा उस्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर (प्रतिनिधी) : 

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे रक्ताची गरज वाढत आहे पण त्या तुलनेत रक्त साठा अपूरा आहे यासाठी समाजाचे आपणही काही देणे लागतो या भावनेतून वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन WMO च्या वतीने आज (रविवार) आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ३६० रक्तदातांनी रक्तदान केले. डॉ. संगीता निंबाळकर, संताजी घोरपडे, दिनेश कदम यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

राम मंगल सांस्कृतिक भवन, सायबर चौक, रिंग रोड, एनसीसी भवनसमोर, कोल्हापूर येथे हे शिबिर झाले. या शिबिराचे आयोजक म्हणून अजय हवालदार, विकास जाधव, निलेश खराडे, जीतू साबळे, ज्ञानेश गावडे, अक्षय तळेकर, संताजी पाटील आणि डब्ल्यूएमओच्या टीमने काम पाहिले.

वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन WMO च्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील  २३ जिल्ह्यामध्ये ३६ ठिकाणी एकाच दिवशी रक्तदान शिबिर पार पडले. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. या निमित्ताने वर्ल्ड मराठा ऑर्गनाझेशन WMO ची सामाजिक बांधिलकी दिसून आली. 

1 comment: