Sunday, 25 April 2021

हेरले (ता. हातकणंगले ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत गावे कोरोना मुक्त करण्यासाठी मोहीम

हेरले / प्रतिनिधी
दि.25/4/21

हेरले (ता. हातकणंगले ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत हेरले माले चोकाक अतिग्रे मुडशिंगी रूकडी या सहा गावांमध्ये  ११८ जणांना कोरोणाची लागण झाल्याने ते उपचार घेत आहेत. पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  कोरोना प्रतिबंधक लस ७९१३ जणांनी घेतली आहे.
         हेरले प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत हेरले वीस रुग्ण, माले एक रुग्ण ,चोकाक दोन रुग्ण, अतिग्रे चौदा रुग्ण, मुडशिंगी चार रुग्ण, रुकडी सत्त्यात्तर रुग्ण कोरोना संसर्गाचा उपचार घेत आहेत. हेरले गावात एक तर रुकडी गावात चार रुग्णांचा कोरोणा आजाराने मृत्यू झाला आहे.
        वैद्यकिय अधिकारी डॉ. राहुल देशमुख यांनी हेरले गावामध्ये कोरोणाचा फैलाव रोखण्यासाठी व कोरोना मुक्त गाव करण्यासाठी विशेष उपचार मोहिम सुरू करणार आहेत . या मोहिमेमध्ये त्यांनी आशा स्वंयसेविका व अंगणवाडी सेविका यांची नेमणूक केली आहे. त्या प्रत्येक घराघरांतील कुटुंबांतील सदस्यांचे सर्वेक्षण करून कोवीड सदृश्य लक्षणे यांची तपासणी करणार आहेत. ग्रामपंचायतीच्या मदतीने प्रत्येक वार्डात एक ते दोन आरोग्यदूत नेमणूक करून त्यांना प्रशिक्षित केले जाणार आहे. ते आरोग्यदूत प्रत्येक घरास भेट देऊन नागरिकांचे ऑक्सी मीटरने ऑक्सिजन, थरमलगनने टेंपरेचर स्कॅनिंग करून  ताप, व विविध आजारांची लक्षण आदीची तपासणी केली जाणार आहे. तसेचआजारी रुग्णांना सहा मिनिटे चालवून त्यांची ऑक्सिजन पातळीची पाहणी केली जाणार आहे. त्यामध्ये       गुणदोष आढळल्यास पुढील उपचारासाठी डॉक्टरांना भेटून उपचार घेण्यासाठी सूचना केल्या जाणार आहेत.
       गावातच कोरोना आजारावर उपचार व्हावा यासाठी गावातील खाजगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या पाच डॉक्टरांचा गट केला आहे.  माफक  पाचशे रुपये फीमध्ये विजिट अंडर टेकिंग तपासणी केली जाणार आहे. त्यामध्ये आजारी रुग्णांची लक्षणे वर्गीकरण, औषध उपचार, त्यांना सहा मिनिटे चालवून त्यांची ऑक्सिजन पातळी तपासली जाणार आहे. त्यामध्ये कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्यास गावातल्या गावातच माफक दरात सामाजिक भान व सामाजिक सेवाभाव या सामाजिक बांधिलकीतून त्यांच्यावर घरी उपचार केले जाणार आहेत. या उपचार गटामध्ये स्वयंस्फूर्तीने डॉ.महावीर पाटील, डॉ. प्रविण चौगुले, डॉ. अमोल चौगुले, डॉ. नितीन चौगुले, डॉ.इमरान देसाई आदी डॉक्टर उपचार सेवा देणार आहेत.
        कोरोणाचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रतिबंधक लस मोहीम एक मार्च पासून सुरु आहे. ४५ ते ५९ वय व  ६० वयावरील नागरिकांना लस देण्याचे कार्य सुरू आहे. या मोहिमेमध्ये  हेरलेमध्ये १८०७ ,मालेमध्ये ६६४ , चोकाकमध्ये १०२१ ,अतिग्रेमध्ये ११३९, मुडशिंगीमध्ये २८४ व रूकडीमध्ये २९९८  मिळून एकूण  ७९१३ लोकांना लस देण्यात आली आहे. अशी माहिती प्रसिध्दीस वैद्यकिय अधिकारी डॉ. राहूल देशमुख यांनी दिली.

No comments:

Post a Comment