Sunday, 25 April 2021

हेरले (ता. हातकणंगले) येथे कोरोनाचा संसर्ग फैलाव रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर विशेष मोहिम

हेरले / वार्ताहर
हेरले (ता. हातकणंगले) येथे कोरोनाचा संसर्ग फैलाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत  व कोरोना सनियंत्रण समितीच्या वतीने विविध मोहिमेद्वारे कार्य सुरू आहे.
       गावांमध्ये शनिवार व मंगळवार या दोन दिवशी भरणारा आठवडी बाजार बंद केला आहे. सर्व दुकाने सकाळी ७ ते११ याच वेळेत सुरू राहण्याचा वेळ निर्धारित करून कडक अंमलबजावणी केली जात आहे. दुकानदारांकडून नियमांचे उल्लघंन झाल्यास पाचशे रूपये दंड ठरविला आहे. गावातून विनामास्क फिरणाऱ्यांवर शंभर रूपये दंड ठरवून आजपर्यंत चार हजार रूपयाचा दंड वसूल केला आहे. गावांमध्ये भाजीपाला विक्रेते गावातील प्रमुख मार्गावर सकाळी व संध्याकाळी सोशल डिस्टन्स ठेवून विक्रीस बसत आहेत.
       साबणाने वारंवार हात स्वच्छ धूवा, मास्क वापरा, सॅनिटाझरचा वापर करा, सोशल डिस्टन्स पाळा असा प्रबोधनपर संदेश दैनदिंन गाडी फिरवून दिला जात आहे. पोलिस पाटील नयन पाटील, सरपंच अश्विनी चौगुले ,उपसरपंच सतिश काशिद माजी उपसरपंच संदीप चौगुले, विजय भोसले, राहुल शेटे, ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण, सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी व स्वयंमसेवक आदी या समाजसेवेमध्ये कार्यरत आहेत. 

No comments:

Post a Comment