चार सायकलस्वार कसबा बावड्यात येतात काय अनं दौलत धाब्यात जेवतात कायं ?
ही घटना काय आश्चर्य वाटण्यासारखी नक्कीच नाही, पण ही घटना जरा वेगळीच आहे.
देशातील चार वेगवेगळ्या राज्यातले मित्र, कॉलेजात एकत्र होते पण शिक्षण पुर्ण झाल्यानंतर कोणी नोकरी करतो तरं कोणी स्वतःच्या व्यवसायात मग्न. अशा परिस्थीतीत देखिल हे मित्र एकमेकांशी नियमित संपर्क ठेऊन होते.
एके दिवशी या मित्रांनी सायकलींग करत काश्मीर ते कन्याकुमारी दौरा करायचा बेत ठरवला;
अन् प्रवासाला बाहेर निघाले.
सायकली सोबत घेऊन रेल्वेने जम्मुत पोहोचले आणि कटरा- वैष्णोदवीच्या पायथ्या पासुन सायकल वरुन प्रवास करण्यास सुरवात केली. दररोज १०० कि.मी. सायकलींग करणे, मिळेल त्या ठिकाणी वस्ती करणे आणि दुस-या दिवशी पुढच्या प्रवासाला सुरवात करणे. असे तब्बल बाविस दिवस प्रवासाचे सातत्य व नित्यक्रम संभाळत हि मंडळी सुमारे सव्वा दोन हजार कि.मी. सायकलिंग करतं कोल्हापूरच्या दिशेने कसबा बावडा मार्गे येऊ लागली, वेळ दुपारची रणरणत्या उन्हात जेवण्याची वेळ झाल्याने त्यांची नजर रस्त्या कडच्या दौलत ढाब्याकडे गेली.
कोल्हापूरी मटण भाकरी अन् तांबडा पांढरा रस्सा या मेजवानीच्या बोर्ड वाचला तश्या सायकली हॉटेलच्या दारातच थांबल्या.
रस्त्या कडेलाच सायकली पार्क केल्या, धाब्यात प्रवेश केला, सायकलीवरचा काश्मीर ते कन्याकुमारी दौरा बोर्ड वाचून धाबा मालकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. त्यांनी चौघांची विचारपूस
स्वागत केले, व आंत बसण्याची व्यवस्था केली, वाॅश घेऊन सर्वजण खुर्चीत स्थिरावले. जेवणाची आर्डर घेतली आणि मालक पुढच्या तयारीला लागले.
धाब्याचे मालक हे माझ्या भावाचे म्हणजे दिलीपचे मित्र आहेत, त्यांनी भावाला फोन केला;
अरे... दिलीप ..
आपल्या धाब्यात चार सायकलस्वार जेवायला थांबल्यात अन् तु लगेच ये... काश्मीर वरनं ,सायकल चालवत आल्यात...ते !
घरापासुन धाबा जवळच असल्याने , तो सायकलने धाब्या कडे लगेचचं गेला. दिलीप हा प्रथितयश व्यावसायिक असला तरी त्याला सायकलिंगची आवड आहे हे धाबा मालकास माहित होते. दिलीप रोज न चुकता भरपूर सायकलिंग करतो.
दिलीपने चौघानां नमस्कार करुन त्यांची ओळख करुन घेतली व विचारपूस केली, दरम्यान जेवणाची ताटे टेबलावर आल्यावर.
तुम्ही आता निवांत जे़वा नंंतर बोलू असे सांगून
दिलीप त्यांना आग्रह करुन वाढत होता.सर्वांनी मस्तपैकी जेवणाचा मनसोक्त आस्वाद आणि कोल्हापूरी पाहुणचाराचा अनुभव घेतला !
सर्वांचे जेवण संपताच, दिलीपने त्यांना सांगितले की,
हे जेवण माझ्या मार्फत आहे! तूम्ही बिल देऊ नका.
असे बोलल्यावर ते सर्वजन स्तब्ध च झाले...!
कृतज्ञतेचे भाव त्यांच्या चेह-यावर दिसत होते !
थोडे गंभीर झाले होते ... त्यांच्या डोळ्याचा कडा थोडया पाणावल्या होत्या !
एकाने बोलण्यास सुरवात की,
दिलीपभाऊ निव्वळ आभार मानण्या इतपत हे तुम्ही दिलेलं जेवणं नाही तरं आयुष्यभर आम्ही स्मरणात ठेवणार !
त्यांचे कारणंही आम्ही आपल्याला सांगतो...आम्ही काश्मीर पासुन इथे पर्यंत प्रवास केला परंतु कोणीही आम्हाला जेवणाबद्दल विचारले नाही फक्त कोल्हापूरातचं आणि इथे विचारले ! आपली आपुलकी आणि कोल्हापूरी पाहुणचार अविस्मरणीय आहे.
आणि आम्ही जेवलो हे आमचं भाग्यचं❗
दिलीपने स्वतः बनविलेली सायकल त्यांनी पाहिली, दिलीपचे कौतुक केले ! अभिनंदन केले !धाबा मालकांचे स्वादिष्ठ जेवण दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
कोल्हापूरात आपुलकीने केलेला पाहुणचार स्विकारताना समाधानी आणि तृप्त भावना मनात घेऊन चार सायकलस्वार कन्याकुमारीच्या दिशेने पुढच्या प्रवासास मार्गस्थ झाले!
शब्दांकन
✍️ पंडित सुतार,कोल्हापूर.
माझ्या शाहूरायाच्या भूमीत हे अस कौतिक हुनारच ���� लय भारी ॥
ReplyDeleteEk no... Assal kolhapuri... Kaka lay bhari🥰♥
ReplyDelete