कोल्हापूर / प्रतिनिधी
दि.27/5/21
शिक्षकांचे मुल्यमापन बाहय यंत्रणेमार्फत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने तीस कोटी रुपयांची निविदा मागविली आहे. त्याला कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाने मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवन येथील झालेल्या सभेत तीव्र विरोध केला. सभेच्या अध्यक्षस्थानी एस.डी. लाड होते. शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक संपन्न झाली.
शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर म्हणाले की, बाह्य संस्थेकडून शिक्षकांच्या मुल्यमापनाला सर्व शिक्षक व पदवीधर आमदारांचा तीव्र विरोध असून हा प्रकल्प रद्द करण्यासाठी शालेय शिक्षण मंत्र्यांची भेट घेण्यात येईल. १९८१ च्या सेवा शर्ती नियमानुसार शिक्षकांचे मुल्यमापन झाले पाहिजे असे ठामपणे त्यांनी प्रतिपादन केले. महाराष्ट्रात सर्वात प्रथम कोल्हापूरातून या प्रकल्पाला विरोध करण्यास सुरूवात झाली आहे. त्याचे लोन संपूर्ण महाराष्ट्रात पसरेल परिणामी हा निर्णय शासनाला मागे घ्यावाच लागेल.
हा निर्णय रद्द करण्यासाठी शैक्षणिक व्यासपीठामार्फत पहिल्या टप्प्यात सोमवार दि.३१ मे रोजी व्यासपीठाचे शिष्टमंडळ शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक यांना या शासन निर्णयाविरोधात निवेदन देतील,दुसऱ्या टप्प्यात लवकरच व्यासपीठाचे शिष्टमंडळ शालेय शिक्षण मंत्र्यांना निवेदन देतील, तिसऱ्या टप्प्यात जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात येईल,चौथ्या टप्प्यात शासनाने हा आदेश रद्द न केल्यास संपूर्ण महाराष्ट्रभर या निर्णयाच्या विरोधात आंदोलन केले जाईल.
या सभेत शिक्षक आमदार प्रा.आसगावकर यांनी घोषीत केले की, जिल्ह्यात कोरोना बालक जनजागृती अभियान सुरू केले जाणार असून त्याद्वारे शिक्षक कोरोना विषाणू बद्दल विद्यार्थ्यांची व पालकांची जनजागृती करतील. रविवार दि. ३० मे रोजी बालरोग तज्ञ शिक्षकांना ऑनलाईन समुपदेशन करून प्रशिक्षित करतील. प्रास्ताविक मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ यांनी केले. आभार उपाध्यक्ष मिलिंद पांगिरेकर यांनी मानले.
या सभेस शिक्षक नेते दादासाहेब लाड, चेअरमन सुरेश संकपाळ, बी.जी. बोराडे,राजाराम वरूटे, प्रा.सी एम गायकवाड, खंडेराव जगदाळे , बाबासाहेब पाटील,सुधाकर निर्मळे, के. के. पाटील, उदय पाटील, इरफान अन्सारी, मिलींद पांगिरेकर,संदिप पाटील, काकासाहेब भोकरे, सुधाकर सावंत, गजानन काटकर, अरूण मुजुमदार, शिवाजी वरपे, शिवाजी भोसले, महादेव डावरे, अशोक पाटील, गजानन जाधव, जयसिंग देवकर, राजेश वरक, प्रशांत पोवार, मनोहर जाधव, संजय ओमासे, अजित रणदिवे, जगदिश शिर्के आदी शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो
शैक्षणिक व्यासपीठाच्या सभेत मार्गदर्शन करतांना शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर शेजारी अध्यक्ष एस डी लाड शिक्षक नेते दादासाहेब लाड बी जी बोराडे चेअरमन सुरेश संकपाळ व इतर मान्यवर.
No comments:
Post a Comment