हेरलेत तीन दिवस कडक लॉकडाऊन
हेरले / प्रतिनिधी
दि.26/5/21
हेरले ( ता. हातकणंगले ) येथे २७ मे ते २९ मे पर्यंत तीन दिवस कडक लॉक डाऊनचा निर्णय ग्रामपंचायत व कोरोना सनियंत्रण समितीच्या बैठकित घेण्यात आला.
हेरले गावातील कोरोना बाधितांची संख्या १७० पेक्षा जास्त झाली आहे. त्यामुळे हेरले ग्रामपंचायत व कोरोना सनियंत्रण समिती यांच्या वतीने २७ मे ते २९ मे रात्री बारा वाजेपर्यंत कडक लॉक डाऊन घोषित केला आहे.या तीन दिवसाच्या लॉकडाऊनमध्ये विनाकारण घराबाहेर पडल्यास अथवा फिरल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. विनाकारण गाडीवरून फिरणाऱ्यांच्या गाड्या जप्त केल्या जाणार आहेत. गावात कट्टयावर बसणारे,चौका-चौकात चर्चा करत बसणाऱ्यांची अँटीजन चाचणी करण्यात येणार आहे. या लॉकडाऊनच्या काळात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना कारवाईस सामोरे जावे लागणार आहे.
या तीन दिवसामध्ये खासगी दवाखाना, औषध दुकाने, दूध संस्था,सहकारी संस्था व शेतीची औषधे दुकाने चालू राहतील किराणामाल, भाजीपाला व इतर व्यवसाय पूर्णत बंद राहतील याची नागरिकांनी नोंद घ्यावी,असे आवाहन कोरोना सनियंत्रण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
या बैठकिस महिला व बालकल्याण सभापती डॉ. पद्माराणी पाटील, मंडलाधिकारी भारत जाधव, तलाठी एस. ए. बरगाले, ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण, पोलिस पाटील नयन पाटील, प्रा. राजगोड पाटील, माजी उपसरपंच संदिप चौगुले, राहूल शेटे, विजय भोसले, ग्रामपंचायत सदस्य आदिक इनामदार, फरीद नायकवडी, गुरूनाथ नाईक, दादासो कोळेकर, इब्राहिम खतीब, संजय पाटील, शिवराज घेवारी आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment